सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथे पाण्याचा टँकर सुरू !!

img 20260326 wa0447

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथील ठाकरवाडी येथे पाण्याची टंचाई भासू लागल्याने आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या वतीने टँकर सुरू झाल्याची माहिती पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांनी पंचनामाशी दिली.

पहाददरा येथील ठाकरवाडी येथे गेल्या नऊ-दहा दिवसापासून पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली होती.येथील महिलांना साधारण एक किलोमीटर वरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत होते.येथील स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याबाबतची माहिती पंचायत समितीच्या सदस्या अंकिता वाळुंज यांना दिली.

वाळुंज यांनी तातडीने तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रमिला वाळूंज मॅडम त्यांच्याशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठाकरवाडी येथे पाण्याचा टँकर चालू झालेला आहे.स्थानिक ग्रामस्थांनी टँकर चालू झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.

fb img 1773887068819

Related posts

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात विशेष वाहतूक व्यवस्था; दर्शनासाठी १० ठिकाणी वाहनतळाची सुविधा !!

Chief Editor

शिरदाळे गावची जलवाहिनी म्हणून ओळख असलेल्या गाव तळ्याच्या पाणी पातळीत लक्षणीय घट !!

Chief Editor

तमाशा कलावंतांच्या दगदगीची व दुःखाची गावाने,रसिकांनी कदर केली पाहिजे !!

Chief Editor

Leave a Comment