सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात जाणून लागली पाणीटंचाई !!

motion photo 8228824400568671106
motion photo 8228824400568671106

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात लोणी-धामणी परिसरातील मांदळेवाडी, वडगावपीर,पहाडदरा गावांमध्ये व वाडया वस्त्यांमध्ये आतापासून पाणी कमी पडू लागल्याने सध्या शेतात असणारी पिके सुकून जाण्याची भिती या भागातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.

चालू वर्षी या भागामध्ये मे महिन्या पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या परिसरातील ओढे,नाले पाण्याने भरभरून वाहत होते.साधारण जानेवारी महिन्याच्या अखेर पर्यंत अनेक ठिकाणी ओढ्यांना पाणी होते.मात्र नाल्यांचे पाणी आटले होते.आता मात्र मार्च महिन्यात या परिसरातील ओढ्यांचे पाणी आटू लागल्याने ओढे पाण्यावाचून कोरडे दिसू लागले आहेत.

ओढ्यांचे पाणी जसजसे कमी होऊ लागले तस तसे परिसरातील,विंधन विहीरी व विहरींची पाणी पातळी कामी होऊ लागल्याने सध्या शेतात असणार्या पिकांना पाणी कमी पडून पिके सुकून व झळून जाणार अशी भीती या परिसरातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.दरवर्षी गेली कित्येक वर्षे या गावांना व परिसरातील वाड्या वस्त्यांना दरवर्षी सततची पाणीटंचाई आणि दुष्काळाचा दाहक झळा सोसाव्या लागत आहे.पिण्यासाठी व शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे या मागणीकडे शासनाने व राजकीय सर्वपक्षीय नेते मंडळीनी लक्ष द्यावे अशीही मागणी अनेक वर्षापासून या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे.

पण सर्वे झाला, पहाणी केली या व्यतिरिक्त वरिष्ठ पातळीवरून दुसरे काहीच एकू येत नाही. शेतीच्या पिण्याचे सोडा निधान पिण्याच्या पाण्याची तर समस्या सोडवा येते.पण शेतीच्या पाण्याचे काय असा प्रश्न या परिसरातील शेतकरी विचारत आहे.लोणी,धामणी,पहाडधरा,वडगावपीर, मांदळेवाडी या परिसरातील शेतकरी शेतीच्या पाणी टंचाईमुळे साधारण मार्च,एप्रिल,मे या तीन महिन्यात शेतात काहीच पिके घेत नाही.साधारण आता कसे तरी काही ठिकाणी माचे अखेर पर्यंत शेतीसाठी पाणी पुरेल असा अंदाज शेतकर्यांनी व्यक्त केला आहे.

fb img 1773887073740

आतापर्यंत जणावरांना शेतातील हिरावा चारा मिळत आहे.पण पुढील तीन महिने मात्र या परिसरातील शेतकर्यांना दहा ते वीस किलोमीटर दूर जाऊ जनावरांना हिरावा चारा आणावा लगतो.पिण्याच्या पाण्याचे जाऊद्या पण या भागाला शेतीसाठी पाणी मिळणार का ? याचे उत्तर शोधता शोधता एकपिडी मात्र म्हतारपणाकडे झुकली हे मात्र नक्की !!

Related posts

वडगावपीर येथील राजगुडे वस्ती वर बंद असलेल्या घरावर चोरट्यांचा डल्ला!!

Chief Editor

निरंकारी इंग्लिश मीडियम संत समागमात प्रेम, शांती आणि एकत्वाचा संदेश !!

Chief Editor

हिंगेवस्ती- अवसरी बुद्रक ते पहाडदरा रस्त्याच्या घाटात धोकादायक काटेरी झाडा-झुडपांनी विळखा !!

Chief Editor

Leave a Comment