
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव गावडेवाडी येथील राजे शिवछत्रपती चौक येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाल्या असल्याची माहिती आदर्श गाव श्री क्षेत्र गावडे वाडी ग्रामस्थांनी दिली आहे.
गुरुवार (ता .२६ ) रोजी ह.भ.प. मधुकर महाराज गायकवाड यांच्या श्रीराम जन्मोत्सवाच्या कीर्तनाने या सप्ताहाला सुरुवात झाली तर संध्याकाळी ह.भ.प.दत्तात्रय महाराज रुकारी यांचे हरिकीर्तन संपन्न झाले. हा सप्ताह शुक्रवार ( ता ३) एप्रिल रोजी संपन्न होणार आहे.
या सप्ताहात पहाटे पाच ते सात पांडुरंगरुक्मिणीला अभिषेक व महापूजा त्यानंतर पहाटे पाच ते सात काकड आरती,सकाळी आठ ते अकरा व्यासपीठ चालक अनाजी महाराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२ गाथा भजन सायंकाळी,चार ते पाच वाजता प्रवचन व सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ,रात्री सात ते नऊ हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहात ह.भ.प मनिषा ताई वळसे व ज्योती गावडे यांची प्रवचन रुपी सेवा संपन्न झालेली आहे. या सप्ताहात ह.भ.प सुनीताताई शुक्रे,ह.भ.प लंकापती सुनील गावडे,ह.भ.प अनाजी महाराज शेळके, ह.भ.प दयाताई काळे,ह.भ.प सिद्धेश पंढरीनाथ गावडे,ह.भ.प सोनल ताई बुट्टे, ह.भ.प सुरेश शेठ महाराज गावडे,ह.भ.प सयाजी महराज गावडे गौरव शिंदे व ह.भ.प संजीवनी ताई भावेश मंडलिक / गायकवाड यांची प्रवचन रूपाने सेवा होणार आहे.
या सप्ताहात ह.भ.प गोरक्ष महाराज जाधव,ह.भ.प संतोष महाराज बढेकर, ह.भ.प दीनानाथ महाराज शिंदे गावडेवाडी, ह.भ.प बाळासाहेब महाराज झगडे (बारामती ) ह. भ.प गणेश महाराज हिंगे यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न होणार आहे.
तसेच या सप्ताहात हनुमान जन्माचे पहाटे पाच ते सात वाजता ह.भ.प संतोष महाराज गावडे यांचे गुरुवारी हनुमान जन्माचे किर्तन संपन्न होणार आहे तर रात्री सात ते नऊ वाजता ह. भ.प चेतन महाराज सातकर यांचे कीर्तन होणार आहे या सप्ताहाची सांगता शुक्रवारी (ता . ३ ) एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा वाजता ह. भ.प किशोर महाराज बांगर चिखलगाव यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून होणार आहे या श्रवण सुखाचा लाभ पंचक्रोशीतीलतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन गावडेवाडी ग्रामस्थ व अखंड हरिनाम सप्ताह कमिटी यांनी केले आहे.


