सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाला एकल महिला दिन !!

1009933222

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथील ग्रामपंचायत कार्यालयात एकल महिला दिनाचे औचित्य साधून सर्व उपस्थित एकल महिलाच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने २५ एकल महिलांना प्रत्येकी एक छत्री ग्रामपंचायत पारगाव यांच्या वतीने भेट देण्यात आली.तसेच महिलांचा शाल श्रीफळ देऊन उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.

यावेळी उपसरपंच नितीन ढोबळे,ग्रामपंचायत सदस्या प्रियंका ढोबळे,अंकिता लोखंडे,रोहिणी देवडे,गीतांजली लोंढे,राजश्री ढोबळे,मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे ग्रामपंचयात सदय बाळासाहेब ढोबळे,काळुराम लोखंडे,विरेंद्र ढोबळे,किरण ढोबळे,ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजणे, ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र ढोबळे, प्रशांत जाधव तसेच एकल महिला भगिनी उपस्थित होत्या.

ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजणे यांनी एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यावर तिचे मंगळसुत्र जोडवे काढणे या प्रथा बंद झाल्या पाहिजे असे सांगितले.

एकल महिलांना धार्मिक कार्यक्रमांत सहभागी करून घेतले पाहिजे,विधवा महिलांनी दागिने घालणे,आत्मविश्वासाने वावरणे, गणपती आरती महिलांच्या हस्ते घेतली पाहिजे,हळदी कुंकू कार्यक्रमात एकल महिलांना सहभागी करून घेतले पाहिजे असे मत श्रीमती लीना कासार आणि उषा पोटे यांनी व्यक्त केले.

1009850407

Related posts

धोकादायक विहिरीला बसवले कठडे;पारगाव (शिंगवे) परिसरातील वाहतूक सुरक्षित !!

Chief Editor

जीवन प्रवासात एकवेळ “पंगत” चुकली तर चालेल मात्र “संगत” चुकायला नको…!!

Chief Editor

वाफगाव येथील यशवंतराव होळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप !!

Chief Editor

Leave a Comment