सामाजिक

१३ ऑगस्टपासून भीमाशंकर मंदिरात भाविकांना दिवसभर दर्शनश्रावण महिन्यातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर दर्शनाची वेळ वाढविण्याचा निर्णय !!

1010527525

पंचनामा प्रतिनिधी भीमाशंकर : श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे होणारी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी दि. १३ ऑगस्टपासून सकाळी ५ ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात भीमाशंकरच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या मंदिरात सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, श्रावण महिन्यात विशेषतः श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने दर्शनाची वेळ वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्रशासनाकडून यात्रा नियोजनावर भर

श्रावण सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात यात्रा नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भीमाशंकर परिसरातील विकास आराखड्यांतर्गत सभामंडप तसेच पायरी मार्गाचे काम सुरू असल्याने दर्शन व्यवस्था काही प्रमाणात मर्यादित करण्यात आली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित कामे थांबवून दर्शन व्यवस्था सुरळीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वाहतूक व सुरक्षेसाठी विशेष नियोजन

श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक व्यवस्था, पार्किंग, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर पोलीस चौकी येथे अतिरिक्त पोलीस उपनिरीक्षकाची नियुक्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मंचर, राजगुरुनगर तसेच नारायणगाव मार्गावरून भीमाशंकरकडे येणाऱ्या वाहनांचे योग्य नियोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच भाविकांना पाणीपुरवठ्याची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

भाविकांची गैरसोय होऊ नये, गर्दीचे योग्य व्यवस्थापन व्हावे आणि यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांकडून समन्वयाने नियोजन करण्यात येत आहे.

1010522631
1010516783
1010457105

Related posts

पारगाव (शिंगवे) येथील पुलावर अपघाताचा धोका;घोड नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक सूचना फलक बसवा – मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांची मागणी!!

Chief Editor

किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक ; पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाची सर्वेक्षण मोहीम सुरु !!

Chief Editor

विजय वळसे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार !!

Chief Editor

Leave a Comment