सामाजिक

कान्हूर मेसाई येथे जिल्हास्तरीय शालेय भजन व गौळण स्पर्धेचा भक्तिरसात रंगलेला सोहळा संपन्न!!

img 20251226 wa0584

सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी भजन स्पर्धांची उपयुक्तता: अमोल मांडवे

पंचनामा सणसवाडी प्रतिनिधी – विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कान्हूर मेसाई व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हास्तरीय शालेय भजन व गौळण स्पर्धा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेमुळे कान्हूर मेसाई परिसरात भक्तिरस दरवळत राहिला.

या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध २२ नामांकित शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भजनांतून श्रद्धा, संस्कार आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवले.

img 20251226 wa0585

स्पर्धेच्या निकालात प्रथम क्रमांक विभागून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सणसवाडी तसेच विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कान्हूर मेसाई यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक लक्ष्मीबाई दुराफे स्कूल, आळंदी व विद्याधाम हायस्कूल, शिक्रापूर यांनी मिळविला. तर तृतीय क्रमांक विद्या विकास मंदिर, करंदी आणि पांडुरंग विद्यालय, विठ्ठलवाडी यांनी संपादन केला.

उत्तेजनार्थ पारितोषिक न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर व सी. एच. भुजबळ विद्यालय, शिक्रापूर यांना देण्यात आले.

यावेळी वैयक्तिक कौशल्यासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांत उत्तम पखवाज वादक – विद्याधाम हायस्कूल, कान्हूर मेसाई, उत्कृष्ट तबला वादक – रामेश्वर सोनवणे (पांडुरंग विद्यालय, विठ्ठलवाडी), उत्कृष्ट हार्मोनियम वादक – ज्ञानेश्वरी कुसेकर (सयाजीराव गायकवाड विद्यालय, पिंपळे जगताप) तसेच उत्कृष्ट गायक – संस्कृती नाणेकर (विद्याधाम हायस्कूल, कान्हूर मेसाई) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, विद्या विकास मंडळाचे सचिव सदाशिव पुंडे, सहसचिव बाळासाहेब पुंडे, संचालक रमेश खर्डे, अमोल पुंडे, अनील चौधरी, संकटमोचक शहाजी दळवी, पिराजी माकर, दीपक पुंडे, सुधीर पुंडे, बाबुराव दळवी, पोलीस कर्मचारी संतोष घोलप, विद्याधाम हायस्कूलचे प्राचार्य विनोद शिंदे, पर्यवेक्षक मनोज धुमाळ, मच्छिंद्र राऊत, दीपक मोरे आलेगाव पागा शाळेचे प्राचार्य तुकाराम बेनके, विठ्ठलवाडी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले. परीक्षक म्हणून माऊली महाराज पिंगळे, सोपानराव राऊत व बाळासाहेब चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे आभार संतोष घोलप यांनी मानले.
या भव्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस बबनदादा शिंदे, युवा सरचिटणीस तुषार बिडवे, माजी सरपंच दादा खर्डे, दीपक तळोले, शहाजी दळवी, भास्कर पुंडे, अ‍ॅड. तुकाराम पुंडे, माजी सरपंच सुनील मिडगुले, कैलास मिडगुले, उपसरपंच सतीश इचके, अमोल पुंडे आदींचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याधाम हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी खूप परिश्रम घेतले.

Related posts

कोलंबो येथे ‘इंडियन पोलीस मित्र भारत इंटरनॅशनल अवॉर्ड – श्रीलंका २०२६’ उत्साहात !!

Chief Editor

समर्थ आय.टी.आय बेल्हे च्या ६३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनी मध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी निवड !!

Chief Editor

आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न, निश्चित ध्येय असल्यास यश निश्चित – लेफ्टनंट तुळशीराम देवराम आदक

Chief Editor

Leave a Comment