सामाजिक

ईपीएफओ उच्च पेन्शनसाठी वंचित पेन्शनधारकांचे शरद पवारांना साकडे !!

fb img 1787625523412

पंचनामा प्रतिनिधी पुणे- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या १९९५उच्च पेन्शन योजनेसाठी सन २०२३ मध्ये पेन्शनधारकांनी प्रत्यक्ष ईपीएफओ कार्यालयात जाऊन सादर केलेले ऑफलाईन संयुक्त दावा अर्ज ग्राह्य धरावेत,किंवा ईपीएफओचे अधिकृत युएएन पोर्टल उपलब्ध करुन देण्याची मागणीबाबत लक्ष घालण्यासाठी विनंती समस्त खाजगी संस्थेतील वंचित निवृत्तीधारकांनी जेष्ठ नेते.माजी केद्रीय संरक्षण व कृषीमंञी शरद पवार यांना निवेदन सादर करुन करण्यात आलेली आहे.

अनेक पेन्शनधारकांनी सन २०२३ साली नियमानुसार भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन संयुक्त दावा अर्ज जमा केलेले होते.माञ सध्या ऑनलाईन प्रणालीअभावी किंवा यूएएन क्रंमाक उपलब्ध नसल्याने त्यांना उच्च पेन्शनपासून वंचित ठेवले जात आहे.त्यामुळे २०२३ला सादर केलेले संबधित ऑनलाईन लाइन अर्ज ग्राह्य धरुन त्या पेन्शनधारकांना उच्च पेन्शन योजनेत सामावून घ्यावे. किंवा त्यांना ईपीएफओकडून अधिकृत यूएएन पोर्टल उपलब्ध करुन द्यावे,अशी विनती शरद पवार यांना करण्यात आलेली आहे.

उच्च पेन्शन योजना ही पेन्शनधारकांसाठी महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना असून ती पेन्शनधारकांच्या दैनदिन जीवनाशी आणि आरोग्याशी निगडीत आहे.त्यामुळे या प्रकरणी सहानभूतीपूर्वक निर्णय लवकर घेण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.या मागणीबाबत केंद्रीय मंञी,मुख्यमंञी,खासदार यांच्याकडेही निवेदनाद्धारे मागणी करण्यात आल्याची माहीती निवृत्तीधारकांच्या वतीने देण्यात आली.

1010806600

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे येथे बालचमूचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

लोणीत मध्यरात्री चोरांनी मारला डल्ला, सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीला !!

Chief Editor

श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ”व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment