सामाजिक

सूर्य शक्ती प्रकल्पांतर्गत शेतीस उपयुक्त सौर व तांत्रिक साहित्याचे लाभार्थ्यांना वितरण !!

img 20260328 wa0722
img 20260328 wa0722

पंचनामा प्रतिनिधी – Horebiger India Pvt. Ltd. CSR फंडाच्या माध्यमातून व Times Employ India Foundation यांच्या अंमलबजावणीद्वारे राबविण्यात आलेला “सूर्य शक्ती प्रकल्प” मिडगुलवाडी गावात यशस्वीपणे पूर्ण झाला असून या प्रकल्पांतर्गत शेतीस उपयुक्त विविध सौर व तांत्रिक साधनसामग्रीचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.

या प्रकल्पाद्वारे गावातील महिला बचत गट व शेतकरी गटांना सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना सोलर पंप, फार्म स्ट्रीट लाईट, सोलर ड्रायर, ड्रिप व स्प्रिंकलर सिंचन प्रणाली, IoT Weather Station, सोलर झटका मशीन आदी आधुनिक शेतीसाठी उपयुक्त साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यासोबतच लाभार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊन तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यात आले, ज्यामुळे ते या साधनांचा प्रभावी वापर करू शकतील.

या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णतेनिमित्त हँडओव्हर सेरेमनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास HOERBIGER कंपनीचे श्री. अरुण वर्मा (Managing Director), श्री. माधव बच्छाव (Plant Operations Manager), सौ. संतती पाटील (Head – People & Culture), श्री. सतीश बढे (Manager – People & Culture) तसेच Times Employees India Foundation चे Mr. Suman Kumar Gope (CSR Head), Mr. Dhruv Mittal (Business Head), दर्शना सावंत उपस्थित होते.

तसेच गावातील मान्यवरांमध्ये सरपंच सौ. निताताई कोळेकर, उपसरपंच श्री. सतीशभाऊ ईचके, मा. सरपंच कैलास मिडगुले, हरिभाऊ मिडगुले, चेअरमन काळूराम गाजरे, अमोल मिडगुले, प्रकाश गाजरे, ह.भ.प. पोपट महाराज मिडगुले, तसेच कृषी कन्या शेतकरी उत्पादक महिला बचत गटाचे सदस्य, लाभार्थी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत सौर ऊर्जेचा वापर, आधुनिक शेती पद्धती, पाणी व्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच अशा प्रकारचे प्रकल्प ग्रामीण भागात शाश्वत विकासासाठी कसे उपयुक्त ठरतात याबाबत मार्गदर्शन केले.

“सूर्य शक्ती प्रकल्प” हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, यामुळे महिला सक्षमीकरण, शेतीतील उत्पादन वाढ, खर्चात बचत आणि शाश्वत शेती विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

fb img 1773887073740

Related posts

आंबेगावातील पूर्व भागात पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला मकर संक्रांतीचा सण !!

Chief Editor

जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे (पारगाव ) शाळेचे पाच विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र !!

Chief Editor

समर्थ मध्ये राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment