सामाजिक

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे संपन्न होणार भैरवनाथ यात्रा महोत्सव !!

img 20260328 wa0614

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या खडकवाडी- नाथनगर येथे भैरवनाथ यात्रा उत्सवा निमित्त मंगळवार ( दि.३१) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ७ ते ८ वाजता श्रींची महापूजा, हारतुरे, मांडव डहाळे व अभिषेक व सकाळी ८ वाजता ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.त्यासाठी एकूण इनाम ३,५१,५५५/ रुपये, चार एलसीडी, चार कूलर, एक फ्रिज,तीन फॅन, तीन जूपता बैलगाडा तसेच घाटाचा राजा ५००१ रुपया तसेच बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक येणाऱ्या गाड्यास ७५००१/, व्दितीय क्रमांक ६५००१/ रुपये, तृत्तीय क्रमांक ५१००१/ रुपये, चतुर्थ क्रमांक २५००१ रुपये बक्षिस असून विशेष आकर्षक फायनलसाठी प्रथम क्रमांकास ४१००१/ रुपये, व्दितीय क्रमांकास ३१००१/ रुपये, तृतीय क्रमांकास २१००१/ रुपये, चतुर्थ क्रमाकांस ११००१/ रूपये, पाचवा क्रमांकास ७७७७/ रूपये तसेच प्रत्येक फायनल बैलगाड्यास आकर्षक ट्रॉफी अशी आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत.

बैलगाडयाच्या शर्यती साठी टोकन रविवार ( दि.२९) रोजी सकाळी ८ ते १२ वाजता काढले जातील.या साठी टोकन फी ५००/ रूपये असेल ती परत केली जाणार नाही.तसेच मंगळवार (दि.३१) रोजी रात्री दहा वाजता मंगला बनसोडे सोबत नितीन बनसोडे करवडीकर यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रम होईल. बुधवार दि. १/४/२०२६ रोजी सकाळी नऊ ते बारा तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम होईल.

बुधवार (दि.०१ एप्रिल ) रोजी ४ ते ६ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल.नंतर भैरवनाथ महोत्सवा निमित्त प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ” जल्लोष ”२०२६ ” हा कार्यक्रम होईल.यात्रेची शोभा वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ खडकवाडी- नाथनगर यांनी केले आहे.अशी माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविली आहे.

fb img 1773887068819

Related posts

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील जेष्ठ आणि तरुणांच्या श्रमदानातून वटवृक्षाला बनवला ओटा !!

Chief Editor

पंचनामा विशेष – नाते कलेचे त्या रक्ताशी !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथे महाशिवरात्र यात्रा उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; मंगळवार दि.१७ व बुधवार दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार!!

Chief Editor

Leave a Comment