सामाजिक

सौ.गायत्री नचिकेत अवधानी ( राजगुरव ) यांची “मानद वन्यजीव रक्षक ” या पदी नियुक्ती !!

img 20260502 wa0557

पंचनामा प्रतिनिधी – सौ.गायत्री नचिकेत अवधानी ( राजगुरव ) यांची महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांच्या तर्फे पुणे जिल्हा ” मानद वन्यजीव रक्षक ” या पदावर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत नियुक्ती झाल्याचे प्रसिद्ध करण्यात आले.

सौ . गायत्री नचिकेत अवधानी ( राजगुरव ) या सन २००५/०६ पासून वन्यजीव रक्षण , संरक्षण , सर्पमित्र , निसर्ग अभ्यासक कार्यरत आहेत , त्या शालेय जीवनापासून सर्पमित्र , सापांविषयी विविध शाळा , काॅलेजेस , गावे , वाडी वस्त्यांवर व्याख्याने , प्रदर्शने , जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करत आल्या आहेत. सापांच्या फ्लेक्स फोटोच्या माध्यमातून सापांची ओळख , विषारी बिनविषारी साप , सापांचे विष प्रकार , सर्पदंश कसे टाळावेत , सापांचे निसर्गातील महत्व , सर्पदंशा नंतर घ्यावयाची काळजी या विषयी समाजात जनजागृती व वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे काम करत आहेत.

fb img 1777627307796

त्यांना ” वाइल्डलाइफ प्रोटेक्शन ॲन्ड रिसर्च सोसायटी इंडिया ” सातारा येथील संस्थेने राज्यस्तरीय सर्पमित्र पुरस्काराने २०१७ मध्ये सन्मानित केले , तसेच ” ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ” शारदानगर बारामती या संस्थेने सन २०१८ मध्ये ” शारदा सन्मान पुरस्कार ” देऊन सन्मानित केले आहे , त्या सध्या ” एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन दौंड ” या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत व ह्या संस्थेच्या माध्यमातून निसर्ग विषयक जनजागृती , वृक्षारोपण , वन्यजीव बचाव , व्याख्याने , वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे काम करत आहेत.

समाजात निसर्ग विषयक संवर्धन , संरक्षण व्यवस्थापनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कार्यरत आहेत , त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची ” पुणे जिल्हा मानद वन्यजीव रक्षक ” या पदावर नियुक्ती केली असून निसर्ग रक्षण , संरक्षण व व्यवस्थापन बळकटीसाठी अधीक जोमाने कार्यरत राहून या पदाला चांगला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सौ गायत्री नचिकेत अवधानी (राजगुरव ) यांनी सांगितले.

fb img 1774661449199

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत प्रशासनाची तत्परता ; मृत गाय आणि मेलेल्या कोंबड्यांची तत्काळ लावली विल्हेवाट !!

Chief Editor

समर्थ गुरुकुलमध्ये ‘समर्थ बालमहोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न !!

Chief Editor

सूर्य शक्ती प्रकल्पांतर्गत शेतीस उपयुक्त सौर व तांत्रिक साहित्याचे लाभार्थ्यांना वितरण !!

Chief Editor

Leave a Comment