सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले मोफत आरोग्य तपासणी शिबिर !!

1009655843

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) या ठिकाणी गजानन क्लिनिक यांच्यावतीने महिला व पुरुषांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये वजन व रक्तदाब तपासणी ,मधुमेह रक्ताचे प्रमाण सर्वसाधारण आरोग्य तपासणी ,स्त्रियांच्या आजार पोट दुखी, गर्भ पिशवी व इतर संबंधित आजार यावर उपचार करून औषधे देण्यात आली.

1009655843

मानपाठ, कंबर दुखी,पोटदुखी, सांधेदुखी ,संधिवात, गुडघेदुखी ,थकवा, अशक्तपणा, या व इतर आजारावर मोफत तपासणी शिबिर आयोजित केले होते. या निमित्ताने औषधे मेडिकल, लॅब रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे यावर 40% चे माफक दरात सवलत देऊन तपासणी करण्यात आली.

या प्रसंगी पारगाव गावचे उपसरपंच नितीन ढोबळे ,सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे ,मेडिसिन डॉ.भोलेनाथ काळे,सोसायटीचे संचालक नामदेव शेठ पुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

1009655839

यामध्ये डॉ.सदानंद राऊत ,डॉ.सुजाता गोरडे, डॉ.वसंत गोरडे ,संदीप गोसावी डॉ. राजेश धुमाळ,मकरंद घोरपडे यांच्या निरीक्षणाखाली हे आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन उपसरपंच नितीन ढोबळे व बजरंग देवडे यांनी केले.

fb img 1774661449199

Related posts

जलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन ; २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण जनजागृती पदयात्रा’; पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !!

Chief Editor

तमाशा फड मालक,अष्टपैलू कलावंत अमन तांबे यांचे निधन

Chief Editor

धामणीत खंडोबाला फुलांची आरास व पारंपारिक श्रीखंड पुजा संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment