सामाजिक

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी !!

1009657012

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी गावातील ग्रामपंचायत कार्यालय तसेच पांडुरंग मंदिर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या समाजहितकारी, लोककल्याणकारी आणि प्रेरणादायी कार्याचे स्मरण केले.

fb img 1774661444136

कार्यक्रमास गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श विचारांचे अनुसरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले असून जारकरवाडी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

Related posts

मानवी अस्तित्वाचा आणि निसर्गाचा मूळ गाभा शोधणारा समृध्द दस्तऐवज : निसर्ग दाता

Chief Editor

धामणी (लोणी) येथे ब्रिटायनिया इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागाला अवकाळीचा तडाखा; नगदी पिकांचे व पशुधनाचे प्रचंड नुकसान !!

Chief Editor

Leave a Comment