सामाजिक

रांजणी (ता.आंबेगाव) गावातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा चालला दुबईला !!

1009972541
1009972541

पंचनामा प्रतिनिधी – राज्यातील सर्वार्थाने प्रगतशील तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पुणे मार्गदर्शित जिज्ञासा लोकसंचालित साधन केंद्र मंचर ता.आंबेगाव जि.पुणे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या भाजीपाला उत्पादन व विक्री भागीदारी उपप्रकल्पांतर्गत आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा 29.5 टन कांदा विश्वास अँड ग्रोथ प्रा. लि. पुणे यांच्या माध्यमातून दुबई सारख्या देशात निर्यात करण्यात आला.

यासाठी रांजणी गावातील श्री भीमाशंकर ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीने उभारलेल्या कांदा गोडाऊन सुविधेचा महिला शेतकऱ्यांना लाभ झाला.

सध्या कांद्याला बाजारभाव कमी असताना श्री भीमाशंकर ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी रांजणी येथे बांधलेल्या कांदा चाळीत कांदा साठवण्यात आला होता. महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे मार्गदर्शित जिज्ञासा लोकसंचालित साधन केंद्र मंचर यांच्या वतीने नरसिंह स्वयंसहाय्यता महिला बचत गट,अंबिका माता बचत गट, विघ्नहर्ता महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या कांद्याला योग्य बाजार भाव मिळवून देऊन दुबई या देशात निर्यात करण्यात आला आहे.

या वेळी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जिज्ञासा लोकसंचलित साधन केंद्र मंचर या संस्थेच्या उपअध्यक्षा सविता सैद,व्यवस्थापक मनीषा जारकड,उपजीविका सल्लागार सविता गाडे,कार्यकारणी सदस्या ऋतुजा ढोबळे,सीमा वाघ, सहयोगिनी रिना वायकर,योगिता लोखंडे,सुप्रभा पिंगळे,भाग्यश्री चासकर तसेच तालुका कृषी अधिकारी श्री धोंडीभाऊ पाबळे, अशोक भोर,अरुण कानसकर, मारुती थोरात,डी.आर.सुपे,विजय वाघ, ज्ञानेश्वर उबाळे,विकास वाघ, तेजस्विनी ॲग्रोटेकचे सर्वेसर्वा नितीन ढोबळे तसेच गटातील महीला उपस्थित होत्या.

1009944556
1009760330

Related posts

पासबुक आणि श्वास बूक” हे दोन्ही रिकामे ठेऊन चालत नाही

Chief Editor

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट खलनायक श्री. संभाजीराव कोल्हे

Chief Editor

पुणे जिल्ह्यातील ५३ शिक्षक, ५२२ गुणवंत विद्यार्थी,अध्यक्ष चषक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या हस्ते सन्मान !!

Chief Editor

Leave a Comment