सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथील आरोग्य केंद्रात 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात आला पोलिओ डोस !!

1009974628
1009974638


पंचनामा प्रतिनिधी – पारगाव (शिंगवे) येथील आरोग्य केंद्रात 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र पारगाव (शिंगवे) येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दि. २८/०६/२०२६ रोजी पारगाव (कारखाना) आरोग्य उपकेंद्राअंतर्गत परिसरातील शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला.

या मोहिमेचा शुभारंभ मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे,सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पारगावचे मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे,पारगाव उपकेंद्राचे डॉ.उमेश सहाने,आरोग्य कर्मचारी सारिका पडवळ,राणी लोले,आदी उपस्थित होते.

उपकेंद्रात गावठाण पारगाव,चिचगाई,लबडे मळा, कारखाना,देवगाव, काठापूर गावठाण, काठापूर झाप,अंबाबा वस्ती,आदी ठिकाणी पल्स पोलिओचा डोस सुरू असल्याची माहिती डॉ उमेश सहाने यांनी दिली.

आरोग्य सेविका सारीका पडवळ, पारगाव येथील सर्व अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर राणी लोले उपस्थित होते.

1009974628
1009948090
1009850407

Related posts

वडगावपीर येथे गणपती-महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ; गुळवे वस्तीवर रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !!

Chief Editor

आदर्शगाव गावडेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात मासवडीचे जेवण;तीन हजार भाकरींचे नियोजन ;महिलांसाठी वीस पैठणींचा लकि ड्राॅ !!

Chief Editor

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

Chief Editor

Leave a Comment