सामाजिक

खडकवाडीच्या कबड्डीपटू मुलींना श्रीनाथ पतसंस्थेचा मदतीचा हात ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ९ हजार रुपयांचे क्रीडा किट भेट; विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक !!

1011233348
1011233348

पंचनामा प्रतिनिधी – खडकवाडी – जिल्हा क्रीडा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे, तालुका क्रीडा अधिकारी आंबेगाव आणि तालुका आंबेगाव क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय खडकवाडी येथे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

1011111248

जिल्हास्तरावर खेळण्यासाठी विद्यार्थिनींना क्रीडा किटची आवश्यकता होती. याबाबत शेखर सुक्रे, दिलीप आप्पा डोके, वैभवशेठ सुक्रे आणि श्रीराम वाळुंज यांनी ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीनाथ पतसंस्था, खडकवाडीचे संस्थापक अध्यक्ष उदयशेठ किसनराव डोके यांनी विद्यार्थिनींसाठी पतसंस्थेच्या माध्यमातून क्रीडा किट देण्याचे जाहीर केले.

त्यानुसार सुमारे ९ हजार रुपये किमतीचे क्रीडा किट तयार करून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना सुपूर्त करण्यात आले. या मदतीमुळे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींचा उत्साह वाढला असून, त्यांच्या क्रीडा प्रवासाला मोठी प्रेरणा मिळाली आहे.

या उपक्रमाबद्दल विद्यालयाच्या वतीने श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदयशेठ डोके, चेअरमन दत्तात्रय बाळासाहेब सुक्रे, व्हा. चेअरमन सौ. जयश्री राजेश रणदिवे तसेच संचालक तुळशीराम बनाजी धुमाळ, सुरेश दत्तात्रय सुक्रे, ज्ञानेश्वर बाबुराव पोखरकर, सुरेश तुकाराम वाळुंज, गोरक्ष सुदाम सुक्रे, ज्ञानेश्वर विठोबा भोजने, दत्तात्रय गोविंद आणि सौ. संगीता आबाजी सुक्रे यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करून आभार मानण्यात आले.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 390586

विद्यार्थिनींच्या यशाला प्रोत्साहन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आर्थिक तसेच साहित्यिक मदत मिळणे महत्त्वाचे आहे. श्रीनाथ पतसंस्थेने पुढाकार घेत विद्यार्थिनींना क्रीडा किट उपलब्ध करून दिल्याने खडकवाडीच्या मुलींच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील कामगिरीसाठी त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे.

Related posts

लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुनील थोरात यांना राज्यस्तरीय ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर !!

Chief Editor

महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता अधिकच गडद !!

Chief Editor

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेच्या मागणीची एसटी प्रशासनाकडून दखल !!

Chief Editor

Leave a Comment