सामाजिक

कनेरसरमध्ये बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !!

1011233705

पंचनामा प्रतिनिधी कनेरसर, ता. खेड : कनेरसर परिसरात आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी डायमंड कंपनीच्या मागील बाजूसही बिबट्या दिसल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा कनेरसर परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कनेरसर गावाच्या जवळच औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) असल्याने परिसरात कामगार, वाहनचालक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अनेक कामगारांना रात्रीच्या शिफ्टसाठी ये-जा करावी लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर आढळल्याने रात्रीच्या वेळी कामावर जाणाऱ्या आणि कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

1011233704

रात्रीच्या शिफ्टमधील कामगारांना संरक्षण द्या!

बिबट्याच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः रात्रीच्या शिफ्टमध्ये ये-जा करणाऱ्या कामगारांसाठी सुरक्षित मार्ग, आवश्यक गस्त आणि आपत्कालीन मदत यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन नागरिकांना योग्य सूचना देण्याची मागणीही होत आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन परिसरात बिबट्या दिसल्यास नागरिकांनी त्याच्या जवळ जाणे, त्याला घेरणे किंवा त्याचे फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करणे टाळावे. बिबट्या दिसल्याची माहिती तातडीने वनविभागाला द्यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

1011111248

Related posts

गुरुकुलचा समर्थ शेळके बारावी सी.बी.एसई.बोर्डामध्ये जुन्नर-आंबेगाव तालुक्यातून प्रथम !!

Chief Editor

जवळे येथे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप !!

Chief Editor

“श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” वाटपाच्या अखंडित सेवार्थ भावनेचे दिंड्यांकडून कौतुक !!

Chief Editor

Leave a Comment