सामाजिक

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा !!

1011324341

पोस्टर प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेतून मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक विचारांचा संदेश !!

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, बेल्हे येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणे तसेच ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने पोस्टर प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून समर्थ शैक्षणिक संकुलाच्या संचालिका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके उपस्थित होत्या. यावेळी समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वैशाली आहेर आणि समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य ऐश्वर्या गटकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

  कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील ताणतणाव, भावनिक संतुलन, सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत प्रभावी संदेश सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि सर्जनशीलतेचा वापर करून तयार केलेल्या पोस्टर्सच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध रंगांचा सुंदर वापर करून आकर्षक, कलात्मक आणि आशयपूर्ण रांगोळ्या साकारल्या. या रांगोळ्यांमधून मानसिक स्वास्थ्य, आनंदी जीवन, सकारात्मकता आणि भावनिक स्थैर्य यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच मानसिक आरोग्याविषयी संवेदनशीलता विकसित होण्यास मदत झाली. 

  या स्पर्धांचे परीक्षण समर्थ शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्या यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असून, निरोगी जीवनासाठी मनाचे स्वास्थ्य जपणे आवश्यक आहे, हा संदेश या उपक्रमांतून देण्यात आला. मानसिक आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करून गरजेनुसार योग्य मार्गदर्शन व मदत घेण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, ही काळाची गरज असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हर्षदा गोफणे, आयेशा जमादार, सानिया शेख, उज्ज्वला साळवे आणि स्नेहल येवले यांनी उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध उपक्रमांमुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
1011291568
1011298056

Related posts

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांना एक्साईड इंडस्ट्रीजची सुवर्णसंधी;फिटर व इलेक्ट्रिशियन विभागातील ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हमधून दमदार निवड !!

Chief Editor

“शिवकन्या रेशमा कुटे यांना ‘पहिली आयर्नमॅन महिला’ होण्याचा बहुमान” !!

Chief Editor

धामणीच्या जिल्हा परिषद शाळेत अनोखा प्रवेशोत्सव;उपक्रमांच्या गर्दीत शैक्षणिक गुणवत्ता राखण्याचे शाळांपुढे आव्हान – ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव

Chief Editor

Leave a Comment