सामाजिक

“श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” वाटपाच्या अखंडित सेवार्थ भावनेचे दिंड्यांकडून कौतुक !!

1010183415

पंचनामा प्रतिनिधी – पुण्यातील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली काही तरुण मंडळी “समर्पण • समन्वय • सातत्य” या त्रिसूत्रीने प्रेरित होऊन आपल्या “श्री सेवा समिती, पुणे” या संस्थेच्या वतीने गेली कित्येक वर्षे आषाढी पालखी वारी सोहळ्याकरीता विविध समजोपायोगी उपक्रम राबवित आले आहेत.

1010183421
1010183416

याही वर्षी सदस्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध भागांतून पुणे येथे वास्तव्यास आलेल्या कित्येक वारकरी दिंड्यांना समितीच्या वतीने अनुभवी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन “श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” चे वाटप करण्यात आले. दिंड्यांच्या प्रमुख चालकांच्या हाती हे संच सुपूर्द केले गेले. वारी दरम्यान प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बारीक सारीक गोष्टी अन् उपयुक्त औषधे या संचामधून उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

1010183414
1010183412
1010183412

समितीच्या वतीने दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवित नावलौकिक वाढविणाऱ्या सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे तसेच “श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” वाटपाच्या अखंडित सेवार्थ भावनेचे दिंडीतील सर्व वैष्णव भक्तगणांनी भरभरून कौतुक करून सर्वश्रींना भविष्यातील वाटचाली साठी आशीर्वाद दिले. यास प्रतिसाद म्हणून येणाऱ्या काळात असेच संघटित राहून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील राहण्याचा मानस असल्याचे समितीचे प्रमुख सदस्य श्री. योगेश तोळेश्वर देवकर आणि श्री. प्रविण सुरेश देवकर यांनी नमूद केले.

Related posts

५१ फुटी श्रीरामरायाच्या भव्य मूर्ती उभारणीचा संकल्प ; पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीतून रामकार्याला हातभार !!

Chief Editor

आषाढीवारीत ‘संवादवारी’; लोककल्याणकारी योजनांच्या जागरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

परसबागेत फुलतेय शेतीची शाळा; डांगर भोपळ्यातून विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण !!

Chief Editor

Leave a Comment