Uncategorized

वारकऱ्यांच्या सेवेसाठी साताऱ्यात चरणसेवा पथके सज्ज; एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग !!

1010183642

पंचनामा प्रतिनिधी – आषाढी वारी २०२६ चे औचित्य साधून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ आणि आरोग्य पथकातर्फे पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांसाठी भव्य ‘चरणसेवा’ व आरोग्य जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा आणि पाऊले मोकळी करून देण्यासाठी जिल्ह्यातील नामांकित वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालयांचे १ हजार हून अधिक स्वयंसेवक जिल्हाधिकारी संतोष पाटील व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. रविराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात येणार आहेत.

जर्मन टेंट पाडेगाव बाळू पाटलाचीवाडी, जनता अर्बन बँक वाई, शाखा लोणंद, जर्मन टेंट वारवंट, प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगाव, जर्मन टेंट वाय.सी. कॉलेज फलटण, गजानन चौक, फलटण, युनिअन बँक जवळ, फलटण व जर्मन टेंट बरड ता. फलटण या ठिकाणी मुख्यमंत्री सहायकता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य विभागाच्यावतीने चरणसेवा व आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत. तरी वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

1009850407

Related posts

लोणी (धामणी ) गावातील विकासकामांचे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ समितीकडून कौतुक; गुणांकन प्रक्रिया संपन्न !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथे लोकसहभागातून अन श्रमदानातून साकार होत आहेत स्थानिक रस्ते!!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे हजारो भाविकांनी घेतला आमटी भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद!!

Chief Editor

Leave a Comment