Uncategorized

लोणी (धामणी ) गावातील विकासकामांचे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ समितीकडून कौतुक; गुणांकन प्रक्रिया संपन्न !!

img 20260509 wa0228
img 20260509 wa0216

पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२०२६’ अंतर्गत नेमण्यात आलेल्या तालुका स्तरीय तपासणी समितीने नुकतीच लोणी गावाला भेट देऊन विकासकामांची सविस्तर पाहणी केली. गावातील विविध योजनांची अंमलबजावणी आणि झालेल्या कामांचा दर्जा पाहून समितीने ग्रामपंचायतीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत कौतुक केले.

या अभियानांतर्गत लोणी गावाने सहभाग नोंदवला होता. त्या अनुषंगाने खालापूर आणि आंबेगाव येथील पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने गावातील प्रत्येक विकासकामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यामध्ये ग्रामपंचायतीचे दप्तर, स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा योजना आणि इतर पायाभूत सुविधांची बारकाईने पाहणी करून गुणांकन प्रक्रिया राबवण्यात आली.

या समितीमध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता:
पंचायत समिती खालापूर: संदीपजी कराड (गटविकास अधिकारी), विशालजी कोटांगडे (प्रकल्प अधिकारी), विनोदजी चांदोरकर (विस्तार अधिकारी), संदीपजी मोगरे (तालुका समन्वयक), आशिष पवार (शाखा अभियंता) आणि सचिन हंबीर.पंचायत समिती आंबेगाव: वैशाली इदे (सहाय्यक गटविकास अधिकारी), रवींद्र खंडारे (विस्तार अधिकारी), सुभाष बारवे (विस्तार अधिकारी) आणि पंकज चौधरी (तालुका समन्वयक).
समितीने कामांचा आढावा घेत असताना गावकऱ्यांशी संवाद साधला आणि लोणी ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

या तपासणी दौऱ्यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. समितीच्या सकारात्मक अभिप्रायामुळे लोणी गावाची मान तालुक्यात उंचावली गेली आहे.
या यशस्वी पाहणी दौऱ्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.

fb img 1774661449199

समितीच्या सदस्यांनी दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाचा उपयोग करून भविष्यात गाव अधिक आदर्श बनवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

img 20260509 wa0227

✍️
श्री. प्रकाश मधुकर गायकवाड
( मा.उपसरपंच लोणी )
( विद्यमान ग्रामपंचायत सदस्य )

Related posts

ग्रामपंचायत जवळे ने घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी राबवली अनोखी संकल्पना!!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली गोडी केळीच्या पिकाची !!

Chief Editor

याझाकी इंडिया कंपनीमध्ये अभियांत्रिकीच्या २३ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

Leave a Comment