सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील लोणी- रानमाळा रस्त्यावर तरुणांवर बिबट्याचा हल्ला !!!

img 20260506 wa0561

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) येथे लोणी -रानमळा रस्त्यावरील भांबेच्या विहिरी जवळ रस्त्याने मोटरसायकल वरून जाणाऱ्या तरुणावरती बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे.

अक्षय अरुण रोकडे व त्याचा भाऊ प्रशांत अरुण रोकडे हे मोटर सायकलवरून रानमळ्याकडून लोणीकडे येत होते.वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने काल मंगळवार दि. ५/५/२०२६ रोजी संध्याकाळी सुमारे सात वाजता मोटर सायकलवर मागे बसलेला प्रशांत अरुण रोकडे यांच्यावर झेप घेऊन पायाचा चावा घेतला.

जखमी झालेल्या प्रशांत याला वन कर्मचाऱ्यांनी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करून घरी सोडले.

img 20260503 wa0578

पैसा -गलठा वस्ती व रानमळा या परिसरात बिबट मादी व दोन बछडे असून आठ दिवसांपूर्वीही प्रवाशांना गलठा वस्ती येथे ही मादी दोन बछडे दिसले होते. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाळुंज पाटील, रानमळ्याचे सरपंच राजेंद्र भगवान शिनलकर यांनी व ग्रामस्थांनी येथे पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.

वन विभागाच्या वनपाल चव्हाण मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नागरिकांनी या परिसरात फिरताना काळजी घ्यावी तसेच लहान मुलांना एकटे सोडू नये,असे आवाहन केले आहे.

fb img 1774661444136

Related posts

पारगाव (शिंगवे ) येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांना फराळाचे वाटप !!

Chief Editor

पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासा !!

Chief Editor

तमाशाफड मालक विलास गायकवाड उर्फ राज देवठाणकर यांचे निधन हे सरकारी अनस्थेचा बळी आहे- अरुण खरात ( तमाशा लोककला व लोक कलावंत अभ्यासक)

Chief Editor

Leave a Comment