Uncategorized

जवळे (ता.आंबेगाव) येथे लोकसहभागातून अन श्रमदानातून साकार होत आहेत स्थानिक रस्ते!!

img 20251224 wa0315
img 20251224 wa0313

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या मौजे जवळे येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने लोकसहभाग,श्रमदानातून पानंद रस्ता नवीन करणे, तसेच दुरुस्ती करणे ही कामे करण्यात येत असून यामध्ये गावातील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.

img 20251224 wa0314

ग्रामस्थांच्या माध्यमातून रस्त्यावरती मुरम टाकून खड्डे बुजवण्यात आले. समृद्ध ग्राम अभियान राबवण्यात येत आहे असे आदर्श सरपंच सौ. वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी सांगितले.

img 20251224 wa0315

यामध्ये संदीप वायाळ, रेवनाथ भुजबळ,मुकुंद भोर, रमेश भुजबळ, अशोक शिंदे, गणेश शिंदे, सौरभ शिंदे, बाळासाहेब अभंग, वसंत अभंग, हरिभाऊ अभंग ,नवनाथ शिंदे, बबन शिंदे, अविनाश वाळुंज महेश लोखंडे ,चिंधू साबळे या ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

img 20251224 wa0316

Related posts

टोयोटा स्किल कॉन्टेस्टमध्ये समर्थच्या माजी विद्यार्थ्याचे घवघवीत यश ; तुषार गवांदे याने महाराष्ट्र व गोवा विभागात पटकावला प्रथम क्रमांक !!

Chief Editor

कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये राजगुरुनगर येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !!

Chief Editor

तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे मोठ्या उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment