Uncategorized

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली गोडी केळीच्या पिकाची !!

img 20251224 wa0281

पंचनामा मंचर प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यात केळी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेल्या डिंभे धरणं ( हुतात्मा बाबू गेणू जलाशय ) मुळे शाश्वत पाण्याची उपलब्धता झाल्याने डिंभे धरणाच्या डावा उजवा कालव्याला व घोडनदी नदीला नियमित पाणी सुटत असल्याने या परिसरातील शेतकरी उसा बरोबर केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत.

आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी उसाबरोबरच इतर पिकांकडेही वळत आहेत.तीन वर्षांत उसाऐवजी केळीचे उत्पादन घेण्याला अनेक शेतकऱ्यांनी पसंती देत आहे.नगदी पीक म्हणून घेतलेल्या या पिकातून शेतकऱ्यांना एकरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळत आहे. शाश्वत पाणी उपलब्ध असणाऱ्या गावांमधून अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला,वेलवर्गीय पिकविण्याला पसंती दिली.तर काही शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून उसाऐवजी केळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला या परिसरात मोजकेच शेतकरी केळीचे उत्पादन घेत होते.मात्र आता या परिसरात केळी लागवडी खालील क्षेत्र वाढलं आहे आंबेगाव तालुक्यातील बागायत पट्टा परिसरातील शेतकऱ्यांनीही केळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या परिसरातील ऊस पट्ट्यातही केळीच्या बागा जोमाने डोलू लागल्या आहेत.शेतकऱ्यांना सध्या केळीच्या लागणीला एकरी ३५ ते ४५ टनाचे उत्पन्न मिळते.तर खोडव्याला २५ ते ३० टनांपर्यंत उत्पन्न घेण्यात येत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या बागायत ऊसाच्या पट्ट्यात केळीची लागवड.

Related posts

पारगाव (शिंगवे) येथे हजारो भाविकांनी घेतला आमटी भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद!!

Chief Editor

कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा !!

Chief Editor

तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे मोठ्या उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment