Uncategorized

कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये राजगुरुनगर येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !!

1009702694
1009702694

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे

कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनच्या खुल्या राज्यस्तीय स्केटिंग स्पर्धेमध्ये राजगुरुनगर पुणे येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश या स्पर्धेत खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ३८४ विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली.

या स्केटिंग स्पर्धेमध्ये राजगुरुनगर येथील मुकुंद अजय चौधरी सुवर्ण पदक,प्रांजल धनेश कांबळे रौप्य पदक,साक्षी प्रवीण फदाले रौप्य पदक,अनिरुद्ध दीपक चव्हाणके रौप्य पदक,युवराज महेंद्र कर्वे रौप्य पदक,सौजन्या मलसिद्धा म्हेत्रे bronze,दक्ष श्रीकांत गोरडे ब्राँझ,सोहम सतीश घोडके ब्राँझ,संभव उमेश शाह ब्राँझ,स्वरा संतोष गोपाळे ब्राँझ,अनुराग संदीप ढोरे ब्राँझ,शांभवी सुधीर मांजरे,अंश स्वप्नील वाडनेरे ब्राँझ
या सर्व स्केटर्सनी उत्कृष्ट स्केटिंग प्रदर्शन करीत राजगुरुनगर शहराचे नाव पुन्हा एकदा स्केटिंग क्रिडा क्षेत्रात झळकावले.

या स्पर्धेचे आयोजन SK स्केटिंग क्लब कोल्हापूरचे कोच सुहास कारेकर यांनी केले तर स्केटिंग कोच प्रियंका कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा विद्यार्थ्यांनी स्केटिंग स्पर्धेची उत्कृष्ठ कामगिरी बजावत राजगुरुनगर शहराचे पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात झळकावले..
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन हे खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर,उपाध्यक्ष अजित लुणावत , सचिव गणेश जोशी,मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पाचारणे, KTES शाळेचे प्राचार्य गणेश देठे व मानसी मिडगे तसेच पदाधिकारी संचालकांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या..

1009702618
fb img 1774661444136
1009703242

Related posts

याझाकी इंडिया कंपनीमध्ये अभियांत्रिकीच्या २३ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

निस्सीम देशभक्त, भारतरत्न, कवी मनाचे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व : अटलजी

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली गोडी केळीच्या पिकाची !!

Chief Editor

Leave a Comment