सामाजिक

सुदृढ माती हीच समृद्ध शेतीची गुरुकिल्ली आहे; माती परीक्षण म्हणजे उत्पादनवाढीचा शास्त्रशुद्ध पाया ;जवळे (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे वाळुंज फार्मवर माती परीक्षण व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

1009693660

पंचनामा प्रतिनिधी – जवळे (ता.आंबेगाव, जि. पुणे) येथील वाळुंज फार्म येथे माती परीक्षण व शेतकरी जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शेतकऱ्यांना मातीचे आरोग्य, संतुलित खत व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमास मा. श्री. तेजस पाटील (विश्वस्त, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी, पुणे) तसेच मा. रिअर अॅडमिरल अमित विक्रम (संकुल संचालक, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी, पुणे) यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सहकार्य, प्रेरणा, प्रोत्साहन व पाठबळ लाभले.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एम. डी. जगताप, समन्वयक प्रा. एस. एन. पाटील तसेच एबीएस अधिकारी प्रा. वैशाली घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी माती परीक्षणाचा कार्यक्रम राबविला. यावेळी कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, मृदा आरोग्य व्यवस्थापन तसेच संतुलित खतांच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमात कृषिकन्या प्रिया घाटोळ, श्रुतिका जाधव, अनुष्का हांडे, सोनिया दुधगावकर, रजनंदिनी वागज, तनिशा फुलसुंदर आणि सुहानी मोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ. वृषालीताई उत्तम शिंदे पाटील , मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव, छाया शिंदे कृषी सहायक, दत्ता लोखंडे,पोपट शिंदे,सुनील वाळुंज,अशोक वाळुंज,रामचंद्र गावडे, विकास बोराटे,सचिन शिंदे, अमोल वाळुंज, प्रवीन वाळुंज,बाबुशा वाळुंज,विजय गायकवाड यांची उपस्थिती लाभली. तसेच ओमकार वाळुंज यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे ठरले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून शास्त्रशुद्ध शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळाले.

“मातीची योग्य ओळख करून घेतल्यास शेतीचे भविष्य उज्ज्वल होते; कारण समृद्ध मातीच समृद्ध शेतकरी घडवते.”

1009693581
1009693324
fb img 1774661449199

Related posts

जलसंधारण दिनानिमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आवाहन !!

Chief Editor

लोकसहभागातून फुलवली वनराई; आंबेगाव तालुक्यातील लोणी ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम !!

Chief Editor

शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

Leave a Comment