Uncategorized

लोणी-पारगाव रस्त्यावर भीषण अपघात ; अपघातात भगवान बाबुराव बढेकर यांचा मृत्यू..

img 20260922 wa0839

पंचनामा प्रतिनिधी – लोणी-पारगाव-मंचर ( ता.आंबेगाव ) रस्त्यावर सोमवार (दि.२१) रोजी बढेकरमळा येथे झालेल्या भीषण अपघातात धामणी येथील बढेकर मळ्यातील भगवान बाबुराव बढेकर ( वय-५२ वर्षे ) या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाढत्या वाहनांच्या वेगावर आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांवर अनेक वाहनचालक बेफाम वेगाने वाहने चालवित असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे.त्यामुळे वाहनचालकांच्या वेगावर प्रभावी निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

दारू अथवा इतर नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.अशा वाहनचालकांमुळे स्वतःबरोबरच रस्त्यावरून जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचेही जीव धोक्यात येतात.त्यामुळे नशेत वाहन चालविणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून अशा चालकांना तुरुंगाची हवा दाखविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वेगावर नियंत्रण, हेल्मेटचा वापर आणि नशेत वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली,तर अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल. पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून लोणी-पारगाव-मंचर रस्त्यावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी स्थानिक नागरीक व वाहान चालकांकडून होत आहे.

Related posts

पालखी सोहळ्यातील वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन !!

Chief Editor

बढेकर डेव्हलपर्सचे श्री प्रविणशेठ बढेकर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट शाळेला दोन इंटरॲक्टिव्ह पॅनल प्रदान !!

Chief Editor

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने केला कहर !!

Chief Editor

Leave a Comment