सामाजिक

शंकरराव केंगले यांच्या पुण्यतिथीनिमित्त जांभोरी येथे अभिवादन

1011036253
1011036253

पंचनामा प्रतिनिधी जांभोरी : आंबेगाव तालुका पंचायत समितीचे पहिले आदिवासी सभापती शंकरराव विठू केंगले यांच्या पुण्यतिथीनिमित्त जांभोरी (ता. आंबेगाव) येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ, महिला मंडळे तसेच नोकरदार मंडळींच्या वतीने शंकरराव केंगले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी शंकरराव विठू केंगले तसेच ‘लायन हार्टेड’ होनाजी केंगले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुतीदादा केंगले यांनी शंकरराव केंगले यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमास जांभोरीचे पोलिस पाटील नवनाथ केंगले, माजी सरपंच नारायण पारधी, जांभोरी ग्रामविकास फाउंडेशनचे कार्याध्यक्ष लिंबाजी केंगले, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष सुनील गिरंगे, पेसा उपाध्यक्ष मीना केंगले, ग्रामपंचायत सदस्या लताबाई केंगले, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक काळू केंगले, नंदकुमार चव्हाण, विठ्ठल मोरे, शिपाई किसन केंगले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेव भोकटे, सामाजिक कार्यकर्ते बबन केंगले, रामदास केंगले, आशाबाई केंगले, भीमाजी आंबेकर, आरोग्य सेविका बागुल मॅडम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार चव्हाण यांनी केले, तर आभार विठ्ठल मोरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बिरसा ब्रिगेड जांभोरी, समस्त ग्रामस्थ, जांभोरी ग्रामविकास फाउंडेशन, ग्रामविकास प्रतिष्ठान नांदूरकीचीवाडी, जांभोरी ग्रामपंचायत, व्यंकोजी दूध उत्पादक संस्था, जांभोरी नोकरदार मंडळी आणि महिला मंडळाच्या वतीने सहकार्य करण्यात आले.

1010908108
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001

Related posts

मांदळेवाडी येथे बिबटयाचा वावर वाढला ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !!

Chief Editor

शिक्षक भरतीची मोठी घोषणा! १३ हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या पात्रता आणि प्रक्रिया !!

Chief Editor

समर्थ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड !!

Chief Editor

Leave a Comment