सामाजिक

श्री भैरवनाथ पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार संपन्न !!

1010718160

पंचनामा प्रतिनिधी मंचर- श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी, चिंचोडी या संस्थेची ३७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मोरया मंगल कार्यालय, वडगाव फाटा, लांडेवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.खासदार श्री. शिवाजीराव द. आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सागर काजळे यांनी दिली.

भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून सर्व शाखा संगणकीकृत व प्रशिक्षित सेवक वर्गासह कार्यरत आहेत. कोअर बँकिंग (CBS), गो डिजिटल व गो कॅशलेस अंतर्गत मोबाईल ॲपव्यवहार, तसेच RTGS, NEFT व IMPS सुविधा संस्थेने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.नैसर्गिक आपत्तीच्या काळात तसेच गरजू घटकांना संस्थेच्या माध्यमातून मदत केली जाते.आरोग्य शिबिरे, नेत्रतपासणी शिबिरे, शैक्षणिक मदत आणि सामाजिक उपक्रमांमध्येही संस्थेचा सक्रिय सहभाग आहे.संस्थेला बँको पुरस्कार प्राप्त झाला असून सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातही संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे.
संस्थेच्या राजगुरुनगर,जुन्नर, ठाणे येथील शाखांना शासनाची परवानगी मिळाली असून त्या लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रमेश खरमाळे यांनी दिली.

1010718160

संस्थेच्या ३७ वर्षांच्या वाटचालीत ग्राहकांचा विश्वास व सहकार्य लाभले असून, ‘विश्वासपूर्ण सहकार्याची ३७ वर्षे’ या संकल्पनेतून संस्थेने आपली सेवा वाटचाल सुरू ठेवली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने सभासदांना करण्यात आले आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997
1010688815
1010725335

Related posts

शिरदाळे (ता.आंबेगाव) परिसर ठरतोय मोरांचे माहेरघर ; संपूर्ण परिसरात ७०० ते ९०० मोरांची संख्या असल्याचा अंदाज !!

Chief Editor

अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद !!नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश; परिस्थितीनुसार रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेणार तहसीलदार

Chief Editor

अंगारकी चतुर्थीनिमित्त मेंगडेवाडीत आज कीर्तन सोहळा !!

Chief Editor

Leave a Comment