सामाजिक

रक्षाबंधनानिमित्त अंगणवाडी सेविका-मदतनीसांना साडी भेट !!

1010721903

पंचनामा प्रतिनिधी पारगाव – बहिण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्त पारगाव येथील सहा अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल सिताराम ढोबळे यांच्या वतीने साडी भेट देण्यात आली.

पारगाव उपकेंद्रांतर्गत पारगाव गावठाण, चिचगाई मळा, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अंगणवाडी, लबडे मळा, ढोबळे मळा, दातखिळे मळा व कारखाना अंगणवाडी येथील सेविका व मदतनीसांना या साड्या देण्यात आल्या.

यावेळी अंगणवाडी सेविकांनी, “विठ्ठल ढोबळे यांच्या रूपाने आम्हाला भाऊ मिळाला. ते नियमित पंढरीची वारी करतात, त्यामुळे त्यांच्या रूपाने आम्हाला विठ्ठलच भेटला,” अशी भावना व्यक्त केली.

ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे यांनी सांगितले की, कोविडच्या कठीण काळातही रक्षाबंधनाच्या दिवशी विठ्ठल ढोबळे यांच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीसांना साडी भेट देण्यात आली होती. ही सामाजिक बांधिलकीची परंपरा त्यांनी यंदाही कायम ठेवली.

यावेळी मा. उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल ढोबळे, मंडलाधिकारी सुरेश तळपे, ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत जाधव तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997
1010688861

Related posts

मोरडेवाडी शाळेचे दोन विद्यार्थी जाणार युरोप, नासा व इस्रोला !!

Chief Editor

लोणी-धामणी परिसरात झेंडू बहरला; नवरात्रीत भाव वाढण्याची शेतकऱ्यांना आशा !!

Chief Editor

समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंची खो-खोमध्ये दमदार कामगिरी !!

Chief Editor

Leave a Comment