सामाजिक

निमणबेट शाळेला दोन इंटरॅक्टिव्ह पॅनलची भेट ; बढेकर डेव्हलपर्सचे प्रविणशेठ बढेकर यांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना सुमारे ३ लाखांचे शैक्षणिक तंत्रज्ञान प्रदान !!

1010725209

पंचनामा प्रतिनिधी पारगाव – आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व डिजिटल शिक्षण मिळावे, या उद्देशाने बढेकर डेव्हलपर्स, पुणेचे श्री. प्रविणशेठ बढेकर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निमणबेट येथे दोन इंटरॅक्टिव्ह पॅनल प्रदान करण्यात आले. या पॅनलचे उद्घाटन सौ. रेखाताई प्रविणशेठ बढेकर यांच्या हस्ते बुधवारी (दि. २६) करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष बढेकर, श्री. विजयजी बढेकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शाळेसाठी इंटरॅक्टिव्ह पॅनलची मागणी करण्यात आली होती. ही मागणी प्रविणशेठ बढेकर यांनी तत्काळ मान्य करून सुमारे ३ लाख रुपये किमतीचे दोन इंटरॅक्टिव्ह पॅनल शाळेला उपलब्ध करून दिले. यापूर्वीही त्यांच्या माध्यमातून शाळेला प्रवेशद्वार देण्यात आले आहे.

1010725209

उद्घाटनप्रसंगी सौ. रेखाताई बढेकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल, असे सांगितले. इंटरॅक्टिव्ह पॅनलचा विद्यार्थी प्रत्यक्ष वापर करत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

निमणबेट शाळा गुणवत्तेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून, डॉ. जयंत नारळीकर अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत खान अकॅडमीच्या माध्यमातूनही शाळेने उत्तम यश संपादन केले आहे. शिक्षकांची मेहनत आणि शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघाचे योगदान याबद्दल यावेळी कौतुक करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी शिक्षक नेते श्री. विजय वळसे, माजी सरपंच बबनराव ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, सरपंच नितीन ढोबळे, पंचायत समिती सदस्य श्वेताताई ढोबळे यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. रामदास उंडे यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे नियोजन शाळेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सौ.रेखाताई प्रविणशेठ बढेकर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सरप्राईज गिफ्टचा आनंद घेतला.

श्री.मनोहर ढोबळे सर यांनी आभार मानले.

1010690614
1010725695

Related posts

हरवले आहेत – श्री.एकनाथ देवराम सुक्रे (आचारी) वय ६० वर्ष राहणार खडकवाडी, लोणी ता.आंबेगाव,जिल्हा पुणे

Chief Editor

लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेची इयत्ता दहावीच्या यशाची परंपरा कायम !!

Chief Editor

चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १६ ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक घेणार- उद्योगमंत्री उदय सामंत

Chief Editor

Leave a Comment