Uncategorized

बढेकर डेव्हलपर्सचे श्री प्रविणशेठ बढेकर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट शाळेला दोन इंटरॲक्टिव्ह पॅनल प्रदान !!

1010725209

पंचनामा प्रतिनिधी – बुधवार दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी बढेकर डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून दोन इंटरॅक्टिव्ह पॅनल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट या शाळेला प्रदान करण्यात आले. इंटरॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन सौ. रेखाताई प्रविणशेठ बढेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आजचे युग हे विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे युग आहे. आपण तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहोत. जर आपण शैक्षणिक क्षेत्राचा विचार केला तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण ही काळाची गरज आहे, या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी व यशाला गवसणी घालण्यासाठी विद्यार्थ्यांना अशा तंत्रज्ञानमय वातावरणात शिक्षण देणे आवश्यक आहे. या डिजिटल युगामध्ये आपली पावले अधिक भक्कम करण्यासाठी इंटरॅक्टिव्ह बोर्डची गरज आहे. श्री.विजयजी बढेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष बढेकर व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माजी विद्यार्थी संघ यांच्यामार्फत सन्माननीय प्रविणशेठ बढेकर यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती तात्काळ मान्य करून 15 ऑगस्टपर्यंत आपण बोर्ड देऊ असे सांगितले. ते आश्वासन ३ लक्ष रुपयांचे इंटरऍक्टिव्ह पॅनल देऊन तडीसही नेले.

आपण यशाची शिखरे गाठत असताना समाजासाठी काहीतरी देण्याची वृत्ती त्यांनी पूर्वीपासून जोपासली आहे. यापूर्वी त्यांच्या माध्यमातून शाळेला प्रवेशद्वार प्राप्त झाले आहे असे मुख्याध्यापकांनी सांगितले. डिजिटल व पारंपारिक अशा दोन्ही पद्धतीने पॅनलचे उद्घाटन करण्यात आले.

सौ. रेखाताई बढेकर यांनी आपल्या मनोगतातून सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हे इंटरॅक्टिव्ह पॅनल विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी दीपस्तंभ ठरतील. विद्यार्थीही इंट्रॅक्टिव्ह पॅनल चा वापर करतात, हे समजल्यावर त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळा गुणवत्तेच्या बाबतीत प्रगती करत आहे. डॉ. जयंत नारळीकर अध्ययन समृद्धी कार्यक्रम अंतर्गत खान अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर शाळेने उत्तम यश संपादन केले आहे. शिक्षकांची मेहनत मी स्वतः शिक्षिका असल्याने मला जाणवली. शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघाने त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला.

1010725209

श्री. विजय वळसे सर (शिक्षक नेते), बबनराव ढोबळे (मा. सरपंच), किरण ढोबळे (ग्रामपंचायत सदस्य), नितीन ढोबळे (सरपंच), श्वेताताई ढोबळे (पंचायत समिती सदस्य) यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी वीरेंद्र ढोबळे, लताताई ढोबळे, रोहिणी देवाडे, प्रियांका ढोबळे इ. ग्रामपंचायत सदस्य व बारकुशेठ ढोबळे, प्रकाश ढोबळे, अनिल पुंडे, किरण ढोबळे सर, योगेश बढेकर, सुनिता ढोबळे, सुशिला महानुभाव, पोपट लबडे, शांताराम थोरात, नवनाथ ढोबळे, विशाल ढोबळे, दयानंद ढोबळे, धनेश फावडे, विलास भूमकर, संतोष ढोबळे, निखिल दातखिळे, मनिषा ढोबळे(अंगणवाडी सेविका) व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. रामदास उंडे यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे नियोजन सौ. चंद्रप्रभा अरगडे मॅडम, गणेश ढोबळे, अशोक ढोबळे, अमोल ढोबळे, किशोर ढोबळे, शरद दातखिळे, स्वप्निल ढोबळे, आरती ढोबळे, पूजा ढोबळे, रेखा कुलकर्णी, निकिता फावडे, काजल ढोबळे, कावेरी ढोबळे, प्रणाली ढोबळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना सौ. रेखाताई प्रविणशेठ बढेकर यांच्याकडून आकर्षक असे शैक्षणिक किट देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना सरप्राईज गिफ्ट खूप आवडले. शेवटी श्री. मनोहर ढोबळे सर यांनी आभार व्यक्त केले.

1010725695
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

लोणी (धामणी ) गावातील विकासकामांचे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ समितीकडून कौतुक; गुणांकन प्रक्रिया संपन्न !!

Chief Editor

वारकऱ्यांच्या सेवेसाठी साताऱ्यात चरणसेवा पथके सज्ज; एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग !!

Chief Editor

एरोकोड कंपनीमध्ये समर्थ अभियांत्रिकी च्या ५ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

Leave a Comment