सामाजिक

न्यू इंग्लिश स्कूल जांभोरीत कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात साजरी!!

1011036455

लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात प्रभातफेरी; विद्यार्थ्यांनी व्यक्त केले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी मनोगत

पंचनामा प्रतिनिधी जांभोरी – आंबेगाव तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील न्यू इंग्लिश स्कूल, जांभोरी येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

1011036456

कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुतीदादा केंगले, जांभोरीचे माजी सरपंच नारायण पारधी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष सुनील गिरंगे, ग्रामपंचायत सदस्या लताबाई केंगले, पेसा उपाध्यक्ष मीना केंगले, पोलीस पाटील नवनाथ केंगले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेव भोकटे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यानंतर जांभोरी गावठाण ते दूध डेअरीपर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. लेझीम पथक आणि ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. या प्रभातफेरीमुळे गावातील वातावरणात उत्साहाचे आणि शैक्षणिक जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मारुतीदादा केंगले यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेडोपाडी शिक्षणाची गंगा पोहोचवून ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, असे सांगत त्यांच्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक काळू केंगले, शिक्षक नंदकुमार चव्हाण, सहशिक्षक विठ्ठल मोरे आणि शिपाई किसन केंगले यांनी केले. कार्यक्रमास रामदास केंगले, बबन केंगले, आशाबाई केंगले, भीमाजी आंबेकर, आरोग्यसेविका बागुल मॅडम यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठल मोरे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

1010908108
1010806600

Related posts

गुड न्यूज – मान्सून पुन्हा सक्रिय होणार; २५ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता;शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला !!

Chief Editor

Chief Editor

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा;नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन !!

Chief Editor

Leave a Comment