
पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जवळे यांच्या वतीने मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून थकित घरपट्टीमध्ये ५०% टक्के सूट व चालू घरपट्टी पूर्ण भरून घेण्यात येत आहे.ही योजना ३१ डिसेंबर पर्यंत आहे याची सर्व ग्रामपंचायत खातेधारकांनी नोंद घ्यावी व आपली थकीत चालू घरपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे आव्हान आदर्श सरपंच सौ. वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी केले आहे.

जवळे ग्रामपंचायतची १९६३ रोजी स्थापना झाली आहे.ग्रामपंचायतची स्थापना झाल्यापासून आज पर्यंत घरपट्टीमध्ये कधीही सूट आली नव्हती परंतु मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकलेले असल्याचे कारणाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबवत असताना घरपट्टीमध्येही तब्बल ५०% सूट जाहीर करून ज्यांची घरपट्टी थकलेली आहे त्यांना दिलासा देण्याचे काम केलेलं आहे. या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन आपापली थकबाकी /चालू पट्टी भरून ग्रामपंचायत ला सहकार्य करावे, व ग्रामपंचायत च्या वतीने केशर आंब्याचे रोप घेऊन जावे असे आवाहन जवळे ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील, मनीषा टाव्हरे उपसरपंच, हरिचंद्र शिंदे,दत्तात्रय लायगुडे, अमोल वाळुंज,चंद्रकला गायकवाड, शुभांगी खालकर, प्रमिला गावडे, संगीता साबळे सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी शिला साबळे, कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

