Uncategorized

पारगाव (शिंगवे) येथे हजारो भाविकांनी घेतला आमटी भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद!!

img 20251224 wa0166
img 20251224 wa0168

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथील कोल्हे मळा या ठिकाणी ह.भ.प.भरत महाराज कोल्हे व दांपत्य यांच्या परिवाराच्या माध्यमातून श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भाविकांसाठी आमटी भाकरीचा महाप्रसाद केला होता. हजारो भाविकांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला.

img 20251224 wa0166

या वेळी रंगदास स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व रामनाथ जप वही पूजन करण्यात आले.त्यानंतर ह.भ प. अश्विनी ताई चासकर यांची प्रवचन सेवा पार पडली, सायंकाळी ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ यांची भजनाचा कार्यक्रम पार पडला.

img 20251224 wa0170

कोल्हे परिवाराच्या वतीने २३ वर्षापासून अखंड अविरतपणे सर्वांना आमटी भाकर चा प्रसाद देण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मा, सरपंच अंकुशराव भूमकर, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे,मा.सरपंच सुनंदा ढोबळे, निवृत्ती महाराज लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लोखंडे ,युवा नेते सुरज भैय्या ढोबळे ,भीम दादा पोंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन नाना ढोबळे, भरत कोल्हे, गोरक्षनाथ कोल्हे ,ग्रामपंचायत सदस्य ,भाग्यश्री कोल्हे व परिवारातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

img 20251224 wa0164

Related posts

तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे मोठ्या उत्साहात संपन्न !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली गोडी केळीच्या पिकाची !!

Chief Editor

कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा !!

Chief Editor

Leave a Comment