Uncategorized

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात !!

img 20251230 wa0807

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात झाली आहे.सुरवातीपासून यंदा पावसाने दमदार सुरवात केली होती.परंतु अंतिम टप्प्यात कमी झालेला पाऊस यामुळे ज्वारीला धान्य काय भरले नाही.त्यामुळे कडबा मात्र झाला पण धान्याचा तुटवडा निर्माण होणार आहे.ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत त्यांना चारा घेणे (कडबा ) मात्र परवडत नसून कडब्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने जनावरे नसणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.परंतू कडबा काढण्यासाठी देखील बरेच कष्ट असून मजूर देखील मिळत नाहीत.जे मजूर मिळतात ते अव्वाच्या सव्वा मजूरी-पैसे मागत असल्याने ते देखील परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.शिरदाळे परिसरात पिकणारा कडबा जनावरांना पोषक असून निरोगी असल्याने त्याला बाहेरील ठिकाणावरून चांगली मागणी आहे.खास करून बैलगाडा मालक गेल्या पंधरा दिवसांपासून रोज कडबा खरेदीसाठी येत आहेत.ते देखील चांगला भाव कडब्याला देत आहेत.

अंतिम टप्प्यात पाऊस झाला असता तर भरपूर धान्य झाले असते आणि धान्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला असता परंतू आता वर्षभर धान्य विकत आणण्यावाचून पर्याय नाही.परंतू दुग्ध व्यवसायिकांना चांगला कडबा निगल्याने उन्हाळभर चाऱ्याचा प्रश्न कमी होत आहे.

शिरदाळे येथील शेती म्हणजे कायमच जुगार राहिलेला आहे.यंदा खरीप हंगामात जास्त पाऊस त्यामुळे पहिले पिक पाण्यात गेले तर ज्वारी होईल या आशेने केलेली पेरणी ती देखील अंतिम टप्प्यात कमी पाऊस झाल्याने धान्य येऊ शकले नाही.त्यामुळे धान्यांचा प्रश्न उभा राहिला.पण दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये गाई असल्यामुळे कडबा मात्र झाला पण जास्त कडबा लागणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा विकत घेणे परवडत नाही.त्यामुळे ते अन्य खाद्याकडे वळतात.परंतू काही शेतकऱ्यांना कडब्याचे चांगले भाव मिळाले त्याचे देखील समाधान आहे असे मा.सरपंच मयुर संभाजी सरडे यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

Related posts

निस्सीम देशभक्त, भारतरत्न, कवी मनाचे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व : अटलजी

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली गोडी केळीच्या पिकाची !!

Chief Editor

कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा !!

Chief Editor

Leave a Comment