
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वर्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या लोणी (धामणी) गावात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. याकामी पुणे ब्लड बँकेचे संतोष साठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हे शिबिर सर्व वीर बजरंगींचे प्रेरणास्थान, धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या पंधराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते.महादेव मंदिर लोणी (ता.आंबेगाव जि.पुणे) या ठिकाणी आपण गेले सात वर्षे हे शिबिर आयोजित केले जाते.
हिंदू धर्मरक्षक श्री अमोल ढगे पाटील तसेच भाजपा पूर्व मंडळचे अध्यक्ष किरण भाऊ वाळुंज पाटील यांच्या नेतृत्वात हे शिबिर संपन्न झाले. या यशस्वी कार्यक्रमामध्ये अनेक विर बजरंगी तरुण सहकाऱ्यांनी मोलाची मदत केली.
यावेळी किरण वाळुंज म्हणाले की आम्ही सर्व तरुण सहकाऱ्यांचे, शिबिरात रक्तदान करणाऱ्या एकूण १४१ रक्तदात्यांचे, आणि पुणे ब्लड बँकेच्या टीम चे मनःपूर्वक आभार मानतो, कारण आपल्या या सहकार्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळणार आहे.

