सामाजिक

निरगुडसर ते निरगुडसर फाटा रस्त्यावर खडीचा धोका; अपघाताची शक्यता वाढली !!

1010672308

निरगुडसर : निरगुडसर (ता. आंबेगाव) ते निरगुडसर फाटा या मार्गावर हायवा डंपरमधून पडलेली खडी रस्त्यावरच राहिल्याने दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर खडी पडलेली असून, संबंधित प्रशासनाने तातडीने ती हटवावी, अशी मागणी ग्रामस्थ, विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.

निरगुडसर–मेंगडेवाडी मार्गावर मोठ्या वाहनांसह दुचाकी, सायकल व इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. जारकरवाडी व गवारमळा परिसरातून अनेक विद्यार्थी सायकलवरून निरगुडसर येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

1010672308

या रस्त्यावरून सायकलस्वार घसरून अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. आधीच या रस्त्याचे काम प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले असताना रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, रस्त्यावर खडी टाकणाऱ्या हायवा डंपर चालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच रस्त्यावरील खडी तातडीने हटवावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

1010457105

Related posts

लेखक व शाहीर राजा पाटील (कवठे महांकाळकर) उर्फ बाप्पू !

Chief Editor

वारकरी सेवेतून मानवतेचा वसा— समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप !!

Chief Editor

ब्रेम्बो इंडिया आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्यात सामंजस्य करार (MoU) संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment