श्री लक्ष्मण झुंबरशेठ वाळुंजसर
(ग्रामीण कथाकार व कवी )
श्री लक्ष्मण झुंबरशेठ वाळुंजसर
(ग्रामीण कथाकार व कवी )

श्री लक्ष्मण झुंबरशेठ वाळुंजसर
(ग्रामीण कथाकार व कवी )
बीएस्सी ,बीएड एम ए,( मराठी)
मा. प्राचार्य , राजगुरुनगर
पंचनामा प्रतिनिधी – डोक्यावर हात ठेवणारे हात ,पवित्र असावेत आणि ज्या पायावर डोके ठेवायचे ते पाय पवित्र असावेत, जो आशीर्वाद मिळतो तो आशीर्वाद देणारा माणूस अधिकारांने ज्ञानवंत, गुणवंत ,यशवंत, किर्तीवंत असला पाहिजे. तरच लाभ होऊन जीवन धन्य ,पावन होते, विकारांचा अंधार नष्ट करून, मानवी जीवनाचे महत्व सांगणारे प्रकाशतेज ज्यावेळेस अंगावर पडते त्यावेळेस खरं जीवन
जगतोय असे वाटते.या सर्व गोष्टी एका ठिकाणी मिळतात ते ठिकाण म्हणजे वंदनीय,पुजनिय आदरणीय मा.लक्ष्मण वाळूंजसर, राजगुरुनगर.
माननीय वाळूजसरांचा कार्य इतिहास एवढा मोठा आहे की, तो येथे मांडायला जागा कमी पडेल.आकाशवाणी पुणे केंद्रावर काव्य कथा वाचन , भारतीय संस्कृती आपले सण, परंपरा, पर्यावरणाचे महत्व आधी विषयावर त्यांचे लेखन प्रसारित झालेले आहेत, गीतरामायणाचे निवेदनकार, अनेक ,वृत्तपत्रे यातून कथा लेखन, राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, नागरी पुरस्कार लोणी ग्रामस्थ, काहूर कथासंग्रह शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार, इत्यादींनी वाळूंजसरांना गौरविलेले आहे.
विद्यार्थीदक्ष शिक्षक, व माझी प्राचार्य अशी पदे त्यांनी भूषविलेले आहेत. बुद्धीचे तेज शब्दात आणि वाणीत,करणीत उठून दिसावे.
चालताना,बोलताना ,लिहिताना पाहून पंचतत्वांना देखील आनंद मिळावा असे महान व्यक्तिमत्व मा.वाळूंजसरांचे आहे.
मी अजूनही लहान आहे ,मोठा होणं बाकी आहे, अशी विनय ,नम्रता,शील, शालीनता, गुरूवर्य वाळूंजसरांना कधीही सोडत नाही. पैसा हा व्यवहार आहे ,माणूस त्याच्यापेक्षा मोठा आहे ,ही खरी जीवन प्रणाली आहे याची महती मा. वाळूजंसरांना पटलेली आहे. आज ते स्वच्छंदपणे निर्मळ मनाने जगतात.
मी लिहिलेल्या तमाशा आणि तमाशा कलावंतावर व इतर लेखांना अतिशय सुंदर अभिप्राय गेल्या पंधरा वर्षापासून मा वाळूंजसर देत आहेत. राजेंद्र डी मोरे ,घडण्यासाठी मा. वाळूंजसर आणि शाहीर खंदारेसर व कलाक्षेत्र यांचे खूप मोठे योगदान आहे. कोणताही माणूस प्रतिसादाशिवाय, प्रोत्साहनाशिवाय पुढे येऊच शकत नाही. कोणाचा तरी हात डोक्यावरती आसल्याशिवाय बुद्धीला पंख फुटत नाही.
मा.वाळूंजसर तमाशाकलेविषयी अतिशय संवेदनशील आहेत, प्रत्येक वर्षी ते बेल्हे सांस्कृतिक लोककला महोत्सवासाठी येतात. कलेतील सर्वांना भेटतात सर्वांना प्रोत्साहन देतात. मा.वाळूजसरांसारखी लाख मोलाची माणसे समाजामध्ये आहेत, म्हणून समाज सुरळीतपणे चालत आहे. साधेपणा हा संपत्तीपेक्षा मोठा असतो, दुसऱ्याला घडविणे, प्रोत्साहन देणे, ज्ञानातून विविध घटक सक्षम बनवणे असे पवित्र काम मा.लक्ष्मण वाळूंजसर करतात याचा निश्चितच अभिमान वाटतो.आधुनिक युगात आदर्श घेण्यासाठी आदर्श पाहिजेत, मा.लक्ष्मण वाळूंजसर आदर्शाचे विद्यापीठ आहेत.
मी काय लिहू या ज्ञानवंतावर, माझी कुवत मला माहिती.
मा.लक्ष्मण वाळूंजसर या ज्ञानवृक्षाच्या शीतलछायेत अनेकांना जीवनाचा बोध प्रकट व्होवो , मा.वाळूंजसरांना आयुष्य ,आरोग्य लाभो एवढी एकच भंगवताकडे प्रार्थना करतो
मा.संजय नलावडे सर ,लेखक , मुंबई यांच्या लेखन कार्यास लेख अर्पण…
राजेंद्र.डी.मोरे, बारामती


