सामाजिक

थोरांदळेच्या जिल्हा परिषद शाळेत महाभोंडल्याचा उत्साह; दांडियाच्या तालावर विद्यार्थ्यांचा ठेका !!

1011379341

पंचनामा प्रतिनिधी थोरांदळे : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत महाभोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक लोकगीतांसह दांडियाच्या तालावर विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. पारंपरिक वेशभूषा, लोकगीते आणि विविध मनोरंजक उपक्रमांमुळे शाळेच्या मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

1011379343

शाळेच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमात महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी भोंडल्याचे प्रतीक असलेल्या हत्तीच्या चित्राचे पूजन केले. ‘एलमा पैलमा’ आणि ‘श्री गणेश देवा’ या गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘डोली तारो ढोल बाजे’, ‘कम्मरिया’, ‘नगाडा संग ढोल’ आणि ‘उडी उडी जाय’ या गाण्यांवर दांडिया खेळण्यात आला. आकर्षक पारंपरिक वेशभूषेतील शिक्षिका व विद्यार्थिनींनी गीतांच्या तालावर फेर धरत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी अनुश्री वाघ हिने आणलेल्या खिरापतीतील बिस्किटे, चॉकलेट आणि फुटाणे ओळखण्याचा खेळ विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरला. या खेळात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

1011379341

विद्यार्थ्यांना लोकपरंपरा, सांस्कृतिक मूल्ये आणि सामूहिक सहभागाची ओळख व्हावी, या उद्देशाने आनंददायी शिक्षणांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती मुख्याध्यापक हेमराज भदाणे यांनी दिली.

या उपक्रमासाठी पदवीधर शिक्षक विनायक पडवळ, राज्य आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे गुरुजी, शैला थोरात, विजय डोके, मिलिंद चिखले, कमल संतोष थोरात, श्वेता चिखले, संदीप शिंदे, मंगल वाघ आणि अनिकेत आवटे यांचे मार्गदर्शन लाभले. पालकवर्ग व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले.

1011379340
img 20261016 wa1042

Related posts

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा;नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन !!

Chief Editor

जुन्या आराखड्या प्रमाणे कांदाचाळ उभारणीस परवानगी द्यावी- प.स.सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी !!

Chief Editor

समर्थ आय.टी.आय बेल्हे च्या ६३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनी मध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी निवड !!

Chief Editor

Leave a Comment