सामाजिक

आदर्श ग्राम गावडेवाडी येथे एकल महिलांचा साडी चोळी, हळद-कुंकू देऊन सन्मान !!

1011379487
1011379487

पंचनामा प्रतिनिधी मंचर – आदर्श ग्राम गावडेवाडी तां (आबेगाव ) येथील साई युवक क्रीडा व नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने गावातील एकल महिलांना हळदीकुंकू व साडीचोळी देऊन या महिलांचा उचित सन्मान करण्यात आला.

पंचक्रोशीत या आगळ्यावेगळ्या अनोख्या कार्याचे व साई युवक व क्रीडा व नवरात्रौ उत्सव मंडळाचे कौतुक होत आहे.

आदर्श गाव गावडेवाडीतील साई व क्रीडा व नवरात्रौ उत्सव मंडळ नेहमीच आगळे वेगळे कार्यक्रम व वंचित घटकांना प्रवाहात आणण्याचे काम करीत असतात.त्याचाच एक भाग म्हणून समाजात एकल महिलांना सन्मान मिळण्यासाठी मंडळाने हे आगळे वेगळे पाऊल उचलले आहे. रविवारी ( ता . १८ ) रोजी भैरवनाथ मंदिर पुढे रात्री आठ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.

1011379489

याच कार्यक्रमात गावात एकूण ३९ वर्षे ग्राम विकास अधिकारी व ज्यांनी गावडेवाडी चे नाव दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रंदिन प्रयत्न केले असे ग्रामविकास अधिकारी मनोहर दत्तात्रय थिटे व त्यांच्या सुविध्य पत्नी शकुंतला मनोहर थिटे यांचा सन्मान करण्यात आला.भैरवनाथ चौकात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला आबालबुद्ध व विशेषता : महिलांनी बहुसंख्येने गर्दी केली होती.कार्यक्रमानंतर महाआरती व त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच देवराम बाळकृष्ण गावडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी साई युवक नवरात्रौ क्रीडा व नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आदर्शग्राम गावडेवाडी (ता. आंबेगाव ) येथील साई युवक क्रीडा व नवरात्रौ उत्सव मंडळाच्या वतीने एकल महिलांचा साडीचोळी व हळदीकुंकू देऊन सन्मान करण्यात आला .

img 20261016 wa1042

Related posts

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू !!

Chief Editor

भावना महत्वाची,भावना जपणे पण तितकंच महत्वाचं !

Chief Editor

लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशाले मध्ये उत्साहात संपन्न झाला आंतरराष्ट्रीय योग दिवस !!

Chief Editor

Leave a Comment