सामाजिक

निरगुडसर विद्यालयात शिक्षक दिन अनोख्या उपक्रमाने साजरा ; दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांनी सांभाळला शाळेचा कारभार !!

1010847339

निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन अनोख्या आणि अभिनव उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी, प्राचार्य, शिक्षक, शिपाई, क्लार्क यांसह शाळेतील विविध जबाबदाऱ्या स्वीकारत संपूर्ण शाळेचा कारभार आपल्या हाती घेतला.

या उपक्रमांतर्गत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन केले. शिक्षकाची भूमिका प्रत्यक्ष पार पाडताना विद्यार्थ्यांना अध्यापनासोबतच शिस्त, नियोजन, संवादकौशल्य आणि जबाबदारीचे महत्त्व अनुभवता आले.

या दिवशी शिक्षकांना सुट्टी देण्यात आली होती. तसेच शाळेतील सर्व वर्गांच्या पालकांना आमंत्रित करून पालक सभेचे आयोजन करण्यात आले.

या सभेत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात विविध शैक्षणिक विषयांवर संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकांशी चर्चा करण्यात आली.

शिक्षक दिनाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. शिक्षकाची भूमिका निभावताना शिक्षकांचे कार्य किती जबाबदारीचे व महत्त्वपूर्ण आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. विद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे पालक व विद्यार्थ्यांकडून कौतुक करण्यात आले.

यावेळी प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेच्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे आणि त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविणारे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यास प्राधान्य दिले जाईल असे निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड.प्रदीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997
1010806600

Related posts

न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावच्या १३ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप !!

Chief Editor

हिंगेवस्ती- अवसरी बुद्रक ते पहाडदरा रस्त्याच्या घाटात धोकादायक काटेरी झाडा-झुडपांनी विळखा !!

Chief Editor

जिल्हा परिषद शिंगवे शाळेला A+ श्रेणी मानांकित !!

Chief Editor

Leave a Comment