आप्पावाडीच्या पावन भूमीत ‘हर हर महादेव’चा जयघोष !!

पंचनामा प्रतिनिधी – आप्पावाडी येथील श्रीराम मंदिर द्वारकाधीश आश्रमात अकरा फुटी भव्य ध्यानस्थ श्री महादेव मूर्तीचे अनावरण संत-महंत, धर्मगुरू, मान्यवर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
आप्पावाडी तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्यानस्थ महादेवाचे दर्शन घेतले. कार्यक्रमानंतर भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यास भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. चेतनजी तायडे, संजय आप्पा बारगजे, डॉ. जीवन राजपूत, डॉ. दिवाकर कुलकर्णी, श्री. रामजी धसे, प्रशांतराव चंद्रमोरे, माजी डी.वाय.एस.पी. आमले साहेब, नगरसेविका सौ. सविता ताई कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तसेच रुद्रानंद स्वामी महाराज, श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉ. प्रदीप चैतन्य फाले महाराज आणि श्री श्री 1008 महामंडलेश्वर आळंदकर ताई यांची विशेष उपस्थिती लाभली. लक्ष्मण आप्पा लिंभारे, रामा आप्पा लिंभारे, ईश्वरा आप्पा लिंभारे, सचिन आप्पा लिंभारे यांच्यासह आप्पावाडी व पंचक्रोशीतील असंख्य भाविक सहभागी झाले.

हा संपूर्ण धार्मिक व आध्यात्मिक सोहळा श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉ. विशालानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. अकरा फुटी ध्यानस्थ महादेव मूर्तीच्या स्थापनेमुळे श्रीराम मंदिर द्वारकाधीश आश्रमाच्या आध्यात्मिक वैभवात भर पडली असून, आप्पावाडीच्या पावन भूमीत भक्ती आणि अध्यात्माचे नवे केंद्र आकाराला आले आहे.

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी रामानंद सरस्वती महाराज, गुरुमाऊली शुभांगी कुलकर्णी, प्रशांत देवळे, अनुसया कुठे ताई, कल्पनाताई वाघमारे, श्री. ढेपले सर, श्री. धनंजय साळुंखे तसेच यशोदीप अकॅडमीचे सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. आश्रमाशी जोडलेले सेवेकरी, शिष्यगण आणि ग्रामस्थांनीही दर्शन व्यवस्था, शोभायात्रा, धार्मिक विधी व महाप्रसादाच्या नियोजनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
अकरा फुटी ध्यानस्थ महादेव मूर्तीच्या रूपाने आप्पावाडीच्या पावन भूमीत श्रद्धा, भक्ती, संस्कृती आणि अध्यात्माचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हे भव्य रूप भाविकांसाठी शांतता, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.




