सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा; श्रीतेज पिंगळेची इस्रो निवडीत भरारी!

1010570242


पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जारकरवाडी येथील विद्यार्थी श्रीतेज मच्छिंद्रनाथ पिंगळे याची इस्रोच्या निवड प्रक्रियेत निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे जारकरवाडी गावासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
इस्रो-नासा चाचणी प्रक्रियेत श्रीतेज पिंगळे याने उल्लेखनीय कामगिरी करत निवड मिळविल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. त्याच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्राबाबतची उत्सुकता वाढण्यास मोठी प्रेरणा मिळणार आहे.
श्रीतेजच्या यशामध्ये त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक सुदर्शन गंगाधर रासकर, गोरक्ष विष्णू उकिरडे तसेच सहमार्गदर्शक शिक्षिका रेखा सुनील वळसे, उज्वला नंदकुमार लंगडे, सुनिता गोपाळ रोडे आणि अशोक नामदेव किरवे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक शिवाजी मारुती चासकर व अब्दुल रहिमान जलील इनामदार यांचेही मार्गदर्शन मिळाले.
या यशाबद्दल केंद्रप्रमुख मच्छिंद्र विठ्ठल काळे, विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज आणि गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी श्रीतेज पिंगळे याचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने मिळविलेल्या या यशामुळे जारकरवाडीच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी ओळख मिळाली असून, शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठीही श्रीतेजचे यश प्रेरणादायी ठरले आहे.श्रेया कुसळ, स्वराज वनवे, श्रीतेज पिंगळे यांची पुणे आयुका येथे मुलाखती साठी निवड झाली झालेल्या मुलाखती मधून श्रीतेज पिंगळे याची निवड इस्रो साठी झाली आहे.

1010560300
1010480394

Related posts

धामणीत सोमवतीला सदानंदाचा येळकोट ; हजारो भाविकांनी घेतले कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन !!

Chief Editor

आंबेगाव पूर्व भागात दुष्काळी परिस्थितीची वळसे पाटलांकडून पाहणी ; शिरदाळे, मांदळेवाडीत भयावह परिस्थिती !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्य शाहीर संघटनेचे अध्यक्ष, तुरेवाले शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे दुःखद निधन

Chief Editor

Leave a Comment