सामाजिक

निरगुडसर फाटा ते लोणी रस्ता वाहनचालक,प्रवाशांची दुरुस्तीवर नाराजी !!

1010845358
1010845371

केवळ मोठे खड्डे बुजवून लहान खड्ड्यांकडे दुर्लक्ष; प्रमुख औद्योगिक व बाजारपेठांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग !!

पंचनामा प्रतिनिधी – निरगुडसर फाटा ते लोणी या महत्त्वपूर्ण मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. मात्र, सुरू असलेल्या कामाच्या पद्धतीवर वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावरील केवळ मोठे खड्डे बुजविले जात असून, त्यांच्या बाजूलाच असलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार प्रवासी व वाहनचालकांनी केली आहे.

हा मार्ग परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्याद्वारे रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापूर एमआयडीसी, सणसवाडी एमआयडीसी, कारेगाव एमआयडीसी, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, नारायणगाव टोमॅटो बाजार तसेच लोणी कृषी उत्पन्न बाजार समिती आदी महत्त्वाच्या ठिकाणांशी संपर्क साधला जातो.

तसेच हा मार्ग शिरूर आणि खेड तालुक्यांना जोडणारा प्रमुख रस्ता असल्याने या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतूक, कामगार, शेतकरी, व्यापारी तसेच प्रवासी वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करताना केवळ काही मोठे खड्डे बुजविण्याऐवजी संपूर्ण रस्त्याची पाहणी करून सर्व खड्डे व्यवस्थित बुजविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

1010845358

सध्या सुरू असलेल्या कामात एका ठिकाणी मोठा खड्डा बुजविला जात असताना त्याच्या लगतचे खड्डे तसेच ठेवले जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे काही दिवसांतच पुन्हा रस्त्याची अवस्था खराब होण्याची शक्यता वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

या मार्गाची वाहतुकीची व आर्थिकदृष्ट्या असलेली महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता संबंधित विभागाने दुरुस्तीचे काम दर्जेदार व सर्वसमावेशक पद्धतीने करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

“महत्त्वाच्या मार्गावरील खड्डे बुजविताना केवळ मोठे खड्डे न भरता संपूर्ण रस्त्याची पाहणी करून सर्व खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी,” अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001
1010760540

Related posts

पारगाव (शिंगवे) येथील आरोग्य केंद्रात 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात आला पोलिओ डोस !!

Chief Editor

गृहमंदिर (वास्तू)- केवढी पवित्र जागा

Chief Editor

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी जगदीश हिरेहब्बू

Chief Editor

Leave a Comment