सामाजिक

वडजादेवी गणेश मंडळाचा धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा आदर्श ; कीर्तन सेवा, महिलांची महाआरती अन् विविध सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सवाला विधायक वळण !!

1011055017

पंचनामा प्रतिनिधी – गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा किंवा उत्सवाचा भाग न राहता सामाजिक एकोपा, धार्मिक संस्कार आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथील वडजादेवी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

1011054212

गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे महिला व विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळाला. उत्सवाच्या दहाव्या दिवशी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व ग्रामस्थांनी महापूजेत सहभागी होत धार्मिक वातावरणात उत्सव साजरा केला.

महापूजेनिमित्त ह. भ. प. नवनाथ महाराज माशेरे यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. आपल्या कीर्तनातून त्यांनी गणेशभक्ती, सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि माणुसकीचे महत्त्व विशद केले. तसेच उत्सव समितीच्या वतीने गावातील महिला भगिनींची महाआरती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

1011055005

यावेळी बोलताना ह. भ. प. नवनाथ महाराज माशेरे म्हणाले, गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा आणि चांगले संस्कार देणारा उत्सव आहे. काही ठिकाणी गणेशोत्सवामध्ये केवळ मोठ्या आवाजातील डीजे आणि धांगडधिंग्याला प्राधान्य दिले जाते. मात्र वडजादेवी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने कीर्तन सेवेसारखा धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाबरोबरच सामाजिक कार्याला हातभार लागणे ही कौतुकाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सामाजिक बांधिलकीची परंपरा

वडजादेवी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान आहे. मंडळाच्या वतीने यापूर्वी रक्तदान शिबिर, तसेच ग्रामस्थांसाठी सर्वरोग निदान शिबिरांसह विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले आहेत. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजाच्या आरोग्याची आणि सामाजिक गरजांची जाणीव ठेवत उपक्रम राबविण्याची मंडळाची परंपरा आहे.

1011054210

गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकजूट आणि जनजागृतीचे स्वरूप दिले. आजच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव हा विविध घटकांना एकत्र आणणारा महत्त्वाचा सामाजिक उत्सव आहे. धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक सलोखा, सांस्कृतिक परंपरांचे जतन, युवकांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे, महिला व विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणे, या माध्यमातून गणेशोत्सवाचे खरे महत्त्व अधोरेखित होते.

त्यामुळे भक्तीला सामाजिक बांधिलकीची जोड, मनोरंजनाला संस्कारांची किनार आणि उत्सवाला समाजसेवेचे अधिष्ठान देत वडजादेवी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा केला आहे. मंडळाच्या या उपक्रमांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

img 20260924 wa0153

Related posts

औषधनिर्माण क्षेत्रातील संधी आणि फार्मासिस्ट ची भूमिका

Chief Editor

आमरण उपोषणासाठी बसलेल्या धामणी गावच्या ग्रामस्थांना परिसरातील गावांनी दिला जाहीर पाठिंबा; पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत केली चर्चा !!

Chief Editor

जिल्हा परिषद शिंगवे शाळेला A+ श्रेणी मानांकित !!

Chief Editor

Leave a Comment