सामाजिक

पारगावच्या तरुणांची भीमाशंकर देवस्थान सायकल वारी ; धार्मिक श्रद्धेला व्यायाम व पर्यावरण संवर्धनाची जोड !!

1010764911
1010764911

पंचनामा प्रतिनिधी – श्रावण महिन्याचे औचित्य साधत आंबेगाव तालुक्यातील पारगाव (भीमाशंकर सहकारी साखर कारखाना) येथील तरुणांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानाकडे सायकल वारी काढली. पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला.

या सायकल वारीमध्ये ह. भ. प. निवृत्ती महाराज लोखंडे आणि प्रतीक ढोबळे सहभागी झाले होते. धार्मिक श्रद्धेसोबतच सायकल चालविण्याचे महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने या तरुणांनी सायकल प्रवास सुरू केला.

श्री क्षेत्र भीमाशंकरकडे सायकलवरून निघालेल्या या तरुणांचा शिनोली येथील कुलदैवत भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच गणपतराव ढेरंगे, माजी सरपंच विठ्ठल भास्कर, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराडे, नरतम शहाशेठ, रुद्र ज्वेलर्सचे नितीनशेठ थोरात, कुंडलिक अरगडे, सामाजिक कार्यकर्ते केशव बांगर, खंडूशेठ कोकणे, पुरोहित यतीन काका कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच मायबांची वाडी येथील स्क्विलर हॉटेलचे गणेशशेठ कोकणे व अक्षयशेठ कोकणे यांनी सायकल वारीतील सहभागींचे स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे हे गेल्या चार वर्षांपासून पारगाव ते आळंदी तसेच आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाने सायकल वारी करीत आहेत. याशिवाय त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणाही ते नियमितपणे करतात.

धार्मिक श्रद्धेला व्यायामाची जोड देत पारगावच्या या तीन तरुणांनी सुरू केलेली सायकल वारी परिसरातील युवक व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रावणातील भक्तिमय वातावरणात सायकल वारीच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्म असा त्रिसूत्री संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. या प्रेरणादायी सायकल प्रवासाचे परिसरातून कौतुक होत असून युवकांनी अशा उपक्रमांत सहभागी व्हावे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001
1010755851

Related posts

डॉ. अलेक्झांडर गिबसन समाधी – भारतीय वनसंवर्धनाचा प्रेरणादायी वारसा !!

Chief Editor

टाव्हरेवाडी (अवसरी बु ) येथे सह्याद्री ॲग्रोव्हेट आयोजित भव्य गोपालक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

कै.श्री.अनंतराव थोपटे कणखर नेता

Chief Editor

Leave a Comment