सामाजिक

धामणी (लोणी) ते ठाणे मुक्कामी गाडीने प्रवाशांना दिलासा !!

img 20260419 wa0292

ठाणे ते धामणी एस.टी सेवा सुरू झाल्याने पंचक्रोशीतील सर्व प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने ठाणे ते धामणी अशी नवीन मुक्कामी एसटी गाडी सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या एसटी गाडीचा मार्ग ठाणे येथून सुरू होऊन पनवेल, लोणावळा,तळेगाव, चाकण, खेड, कनेरसर, पाबळ, लोणी आणि धामणी मुक्कामी असा आहे.

ही गाडी ठाणे येथून दुपारी ०२ वाजता सुटते आणि रात्री १० वाजता धामणी येथे मुक्कामासाठी पोहोचेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता ही गाडी पुन्हा धामणीहून सुटते व त्याच मार्गाने ठाणे येथे दुपारी पोहोचेल.ही गाडी सेवा नुकतीच दोन दिवसांपूर्वी सुरू झाली असून, प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना, कामगारांना तसेच व्यावसायिकांना प्रवास करणे अधिक सोपे आणि सुकर झाले आहे.

img 20260419 wa0292

धामणी ग्रामस्थांच्या वतीने एसटी चालक आणि वाहक यांचा सत्कार सुहास बोऱ्हाडे व योगेश विधाटे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मा. सरपंच अंकुश भुमकर,मा. सरंपच सागर जाधव, शामदादा करंजखेले, शांताराम रोडे, दिपक जाधव, बाबाजी गाढवे,दिलीप पंचरास, बाळासाहेब बढेकर, अरुण बोऱ्हाडे, राजु गाढवे, नवनाथ बढेकर, गोविंद जाधव, सत्यवान बोऱ्हाडे, सुखदेव जाधव उपस्थित होते.

ॲड.विठ्ठलराव जाधव यांनी सांगितले की पूर्वी या मार्गावर थेट वाहतुकीची सोय नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता या नव्या सेवेने त्या अडचणी दूर झाल्या आहेत.या उपक्रमामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, सर्वांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या उपयुक्त सेवेमुळे ग्रामीण भागाचा विकास होण्यासही मोठी मदत होईल त्याच प्रमाणे मच्छिंद्र रोडे व सिताराम भुमकर यांच्या प्रयत्नाला यश आले.

fb img 1774661444136

सरपंच अक्षयराजे विधाटे यांनी सांगितले की अशा या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे प्रवाशांचे जीवन अधिक सुलभ झाले आहे.

गाडीचा मार्ग –
ठाणे → पनवेल → लोणावळा → तळेगाव →चाकण – – खेड → कनेरसर → पाबळ → लोणी → धामणी

⏰ वेळापत्रक:
🕛 ठाणे येथून सुटणे: दुपारी ०२:०० वाजता

धामणी येथे आगमन (मुक्काम): रात्री १०:००वाजता
दुसऱ्या दिवशी धामणीहून
सुटणे: सकाळी 7:00 वाजता

Related posts

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील नारायणगाव, जुन्नर सह बोरी-आळेफाटा, घोडेगाव, चास-कडेवाडी आणि चिंचोली (कोकणे) येथे भव्य स्वच्छता अभियान संपन्न…!!

Chief Editor

समर्थ गुरुकुल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न ; ४३७ विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद !!

Chief Editor

२७ एप्रिल – जागतिक तरस दिवस !!

Chief Editor

Leave a Comment