सामाजिक

हा रस्ता धुक्यात नव्हे तर धुळीत हरवला !!

img 20260109 wa0216
img 20260109 wa0215

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्यात ये- जा करण्यासाठी अवसरी फाटा,निरगुडसर,पारगाव मुख्य रस्ता आहे.या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम सध्या संथ गतीने सुरू असल्याने या रस्त्यावरून जाणार्या येणार्या वाहानाच्या धूळीमूळे रस्त्याच्या कडेला राहाणार्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अवसरी फाटा ते अवसरी,निरगुडसर,पारगाव, पिंपरखेड,जांबुत,शिक्रापूर या रस्त्याचे काम सध्या अवसरी बुद्रक येथील मुक्ताई मंदिरा जवळ सुरू आहे.तर निरगुडसर फाटा ते निरगुडसर येथील बिरोबा मंदिर येथेही काम सुरू होते.पण गेली पंधरा दिवस येथील काम बंद आहे.त्यामुळे या रस्त्यावरून धावणार्या लहान मोठ्या वाहानानमूळे मोठ्या प्रवाणात धूळ उडते व या धूळीचा मोठा त्रास या रस्त्याच्या कडेला असणार्या नागरीक-ग्रामस्थांना होत आहे.एवढेच नव्हे तर घरासमोरील वाहानांवर,भिंतीवर धूळीचे थर साचतात तर घरामधील भाडयांवर सुद्धा धूळ साचते असे येथील महिला ग्रामस्थांनी सांगितले. या रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून संबंधीत ठेकेधाराने पाण्याच्या टँकरने रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था केली. पण टँकर ड्रायव्हर वेळेत पाणी मारत नाही तर काही ठिकाणी पाणीच मारत नाही.नको त्या ठिकाणी जास्त पाणी मारतो, पाहिजे त्या ठिकाणी पाणी मारत नाही असा आरोप येथील स्थानिक महिलांनी केला आहे.या धुळीमुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे संबंधीत विभागाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा येथील महिला याच रस्त्यावर आंदोलन करतील असा इशारा येथील स्थानिक महिला ग्रामस्थांनी दिला आहे.

Related posts

बेल्हा जेजुरी राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरूच !!

Chief Editor

पालखी प्रस्थानानिमित्त ११ जुलै रोजी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; जड-अवजड वाहनांसह अंतर्गत वाहतुकीवर निर्बंध !!

Chief Editor

जलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन ; २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण जनजागृती पदयात्रा’; पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !!

Chief Editor

Leave a Comment