
पंचनामा लोणी-धामणी प्रतिनिधी – लोणी ( ता.आंबेगाव ) येथे पुनीत बालन ग्रुप आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी आयोजित लोणी मॅरेथॉन २०२६ (चौथे वर्ष ) अतिशय उत्साहात संपन्न झाली.पुनीत बालन ग्रुप पुणे,ऑक्झरीच पुणे हे या स्पर्धेचे प्रायोजक होते.संपूर्ण देशातून व महाराष्ट्रामधून जवळपास ३५०० स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर, दहा किलोमीटर आणि २१ किलोमीटर अशा चार प्रकारात पुरुष आणि महिला अशा विभागात ही स्पर्धा पार पडली.प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, चेस्ट नंबर बिब देण्यात आले.तसेच प्रत्येकाला मेडल्स देऊन गौरविण्यात आले.स्पर्धकांच्या सुरक्षतेसाठी रूट वरती हायड्रेशन पॉइंट,डॉक्टरांसहित अद्यावत मेडिकल फॅसिलिटी व मदतीसाठी रूट पायलेट सेवा देण्यात आली.या स्पर्धेत दिव्यांग स्पर्धकांचा सहभाग विशेष लक्षणीय होता.पोलीस प्रशिक्षण केंद्र-दौंड आणि खंडाळा येथीलही अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.अवर पोलीस अधीक्षक आणि आयर्न मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे विष्णू ताम्हाणे,उपमुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ.अमर भडांगे, क्रीडामंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी के.सुनील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि दुबई आणि इटली या देशात मॅरेथॉन पूर्ण केलेले आयर्न मॅन डॉ.सागर गुजराती हे प्रमुख अतिथी आणि सहभागी म्हणून उपस्थित होते.लोणी मॅरेथॉन २०२६ साठी अनेक उद्योजकांनी आर्थिक मोलाचे सहकार्य केले. जनकल्याण सहकारी पतसंस्था लोणी, राजगुरुनगर सहकारी बँक, भैरवनाथ पतसंस्था,वसंत पडवळ,संभाजी पडवळ ,हेमंत पडवळ,चेतन लोखंडे,रोहिदास वायाळ ,अविनाश ढोबळे आणि सर्फराज मोमीन,संतोष वाळुंज ,अनिल डोके त्याचप्रमाणे शाळेचे माजी विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ३५० स्वयंसेवकांनी व प्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे काम केले.याप्रसंगी किसन गायकवाड, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, महसूल विभागातील सहसचिव डॉ.कैलास गायकवाड, प्रबोधिनीचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड, अरुण साकोरे , प्रकाश वाळुंज, पांडुरंग वाळुंज,नवनीत सिनलकर, प्रदीप कोचर याबरोबरच, इंग्लिश मिडीयमचे सर्व शिक्षक यांनी नियोजन केले.या स्पर्धेत वय ७ ते ७२ या वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला हे विशेष.यावेळी लक्ष्मीबाई रामभाऊ गायकवाड,हरिश्चंद्र थोरात आणि भामाबाई मारुती वाळुंज यांना विशेष लक्षवेधी पुरस्कार देण्यात आला. ऋतुजा इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मॅरेथॉनसाठी आवश्यक असे सांगितिक व्यायाम प्रकार करून घेतले. लोणी ग्रामपंचायत व ग्रामस्थ,विविध स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था,सामाजिक संस्था,संतोष पोखरकर,प्रकाश सिनलकर,सुधीर सोनार यांनी मोलाचे सहकार्य केले. पारगाव पोलीस स्टेशनचे सहयाक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले. सर्वांना ऑक्सीरीच पाणी,नाश्ता देऊन मॅरेथॉन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.मॅरेथॉनचे संपूर्ण व्यवस्थापन रेस डायरेक्टर राजेश वाळुंज यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अविनाश वाळुंज आणि डॉ. मयूर लोखंडे यांनी केले.


