सामाजिक

पुण्यात ‘प्रोजेक्ट एक्स’चा धडाकेबाज पर्दाफाश ;आळंदी-मरकळ रस्त्यावरील हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा !!

1009723031

पंचनामा प्रतिनिधी – पुणे शहर आणि परिसरात अंमली पदार्थांविरोधात पुणे पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका आलिशान बंगल्यात अत्यंत गोपनीय पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत ६० ते ७० तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गुन्हे शाखेची १०० पोलिसांची फौज तैनात – मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचे सेवन आणि डीजे पार्टी सुरू होती. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. तब्बल १०० हून अधिक पोलिसांच्या फौजफाट्याने मध्यरात्री या बंगल्याला चहुबाजूंनी वेढा घातला आणि अचानक छापा टाकला.

पार्टीत नशेत धुंद तरुण-तरुणींची धरपकड – पोलिसांनी जेव्हा बंगल्यात प्रवेश केला, तेव्हा तिथे सुरू असलेला धिंगाणा पाहून अधिकारीही अवाक झाले. उपस्थित असलेले तरुण-तरुणी नशेत इतके धुंद होते की, त्यांना काय घडत आहे याचे भानही नव्हते. पोलिसांनी या सर्व ६० ते ७० जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी आणि कसून चौकशी सुरू आहे.

मुख्य आयोजक अटकेत; अमली पदार्थांचा साठा जप्त – पोलिसांच्या परवानगीशिवाय छुप्या पद्धतीने ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने या रेव्ह पार्टीचे आयोजन करणाऱ्या मुख्य आयोजकाला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी नशेसाठी वापरले जाणारे संशयास्पद अमली पदार्थ,मोठ्या प्रमाणावर विदेशी आणि महागडी दारू,हाय-टेक साऊंड सिस्टम जप्त केली आहे.

ड्रग्जचा पुरवठादार कोण? पोलिसांचा तपास सुरू –
पुण्यात सध्या अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्यावरून वातावरण तापलेले आहे. त्यातच थेट ग्रामीण हद्दीत अशी पार्टी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्टीत अंमली पदार्थ कोठून आले आणि ते कोणी पुरवले, याचा शोध आता पुणे गुन्हे शाखा घेत आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
(बातमी सोर्स – सहारा न्यूज)

1009722870
1009722705
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353521

Related posts

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा; जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र !!

Chief Editor

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुक्यात ‘जनसेवा सप्ताह’ उत्साहात साजरा होणार; विविध सामाजिक व आरोग्य उपक्रमांचे आयोजन

Chief Editor

डिंभे धरणातून घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !!

Chief Editor

Leave a Comment